गुरुपुष्यामृत योगावर दागिन्यांची खरेदी; दर उतरल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:21 PM2021-01-29T12:21:17+5:302021-01-29T12:23:01+5:30

Gold Kolhapur- सोन्याचे उतरलेले दर आणि गुरुपुष्यामृत या योगावर गुरुवारी कोल्हापूरकरांनी सोन्या-चांदीच्या अलंकारांची खरेदी केली. यानिमित्त गुजरीसह ब्रॅन्डेड दागिन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होते.

Purchase of jewelery on Gurupushyamrit Yoga; Consequences of falling rates | गुरुपुष्यामृत योगावर दागिन्यांची खरेदी; दर उतरल्याचा परिणाम

गुरुपुष्यामृत योगावर दागिन्यांची खरेदी; दर उतरल्याचा परिणाम

Next
ठळक मुद्देगुरुपुष्यामृत योगावर दागिन्यांची खरेदीदर उतरल्याचा परिणाम

कोल्हापूर : सोन्याचे उतरलेले दर आणि गुरुपुष्यामृत या योगावर गुरुवारी कोल्हापूरकरांनी सोन्या-चांदीच्या अलंकारांची खरेदी केली. यानिमित्त गुजरीसह ब्रॅन्डेड दागिन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होते.

नव्या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत गुुरुवारी होता. त्यातच गेल्या पाच-सहा दिवसात सोन्याचा दर सातशे ते आठशे रुपयांनी कमी झाला आहे. गुरुवारी सोन्याचा दर ४९ हजार १०० रुपये १० ग्रॅम आणि चांदीचा दर ६७ हजार रुपये किलो असा होता, त्यामुळे नागरिकांनी चोख सोन्यासह विविध प्रकारच्या घडणावळीचे अलंकार खरेदी केले. सध्या लग्नसराई नसली तरी पुढील कार्यासाठी म्हणून दागिने बनवण्यासाठीची ऑर्डर दिली जात आहे.

मार्च-एप्रिलमध्ये लग्नसराई सुुरू होते. या काळातील तयारी म्हणून आताच अलंकारांची खरेदी होत आहे. चोख सोने घेतल्यानंतर त्यावर आणि दागिन्यावरही जीएसटी द्यावी लागते त्यामुळे अनेक ग्राहकांनी चोख सोन्याऐवजी लहान मोठ्या अलंकारांवर भर दिला आहे. यात कानातले, टॉप्स, ॲन्टीक ज्वेलरी, ठुशी, कोल्हापुरी साज अशा अलंकारांचा समावेश आहे, अशी माहिती चिपडे सराफचे मुरलीधर चिपडे यांनी दिली.
 

 

Web Title: Purchase of jewelery on Gurupushyamrit Yoga; Consequences of falling rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.