Puja Danole won two gold medals in the National Road Cycling Championship | राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळेला दोन सुवर्णपदक

राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळेला दोन सुवर्णपदक

ठळक मुद्देराष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळेला दोन सुवर्णपदकसायकलिंग क्षेत्रातील आपला दबदबा पुजाने ठेवला कायम

इंगळी /कोल्हापूर : २५ व्या राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळे हिने दोन सुवर्णपदक मिळविले. सलग दोन सुवर्ण पदक जिंकून सायकलींग क्षेत्रातील आपले वर्चस्व पुजाने कायम राखले आहे.

भारतीय सायकलींग महासंघाच्या वतीने २५ व्या रोड सायकलींग अजिंक्य पद स्पर्धा मुंबई येथे होत आहेत. दि ५ मार्च ते ८ मार्च दरम्यान विविध प्रकारामध्ये स्पर्धा होत आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पुजा दानोळे हिने सुवर्ण पदक पटकावले. आज दुसऱ्या दिवशीही पुजाने मास स्टार्ट या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.

पुजाने गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया २०२० स्पर्धेत  ४ सुवर्ण व १ कांस्यपदक मिळविले होते. कामगिरीमध्ये सातत्य राखत पुन्हा भारतीय महासंघाच्या वतीने आयोजित स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई करत देशातील सायकलिंग क्षेत्रातील आपला दबदबा पुजाने कायम ठेवला आहे.

Web Title: Puja Danole won two gold medals in the National Road Cycling Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.