Publicity started in Kolhapur in the presence of Sharad Pawar, Priyanka Gandhi | शरद पवार, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात प्रचार प्रारंभ
शरद पवार, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात प्रचार प्रारंभ

कोल्हापूर : कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत या महिन्याच्या अखेरीस होईल, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितली.

कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ दि. २५ ते २७ मार्चदरम्यान कोल्हापुरातून करण्याचा पक्षीय पातळीवर विचार असून, त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. या प्रारंभास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांनी यावे, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

त्यामुळे खासदार महाडिकदेखील तसे प्रयत्न करीत आहेत. लवकरच त्याची तारीख आम्हांला कळेल, असे मुश्रीफ म्हणाले. कोल्हापुरात भाजप-शिवसेना युतीचा प्रचार प्रारंभ दि. २४ मार्चला होत आहे, त्यांच्यापेक्षा मोठी प्रचार सभा घेऊन आम्ही आमची ताकद दाखवू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
 

 


Web Title: Publicity started in Kolhapur in the presence of Sharad Pawar, Priyanka Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.