नदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:53 PM2020-02-15T19:53:02+5:302020-02-15T19:54:23+5:30

शहरातील कोणत्याही भागातून पंचगंगा नदीत मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी महापालिका अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत केली. महापौर निलोफर आजरेकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

Protect contaminated sewage mixes into the river | नदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखा

नदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखा

googlenewsNext
ठळक मुद्देनदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखामहापालिका, पर्यावरणवादी कार्यकर्ते बैठकीत आ. पाटील यांची सूचना

कोल्हापूर : शहरातील कोणत्याही भागातून पंचगंगा नदीत मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी महापालिका अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत केली. महापौर निलोफर आजरेकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

पंचगंगा नदीत शहरातील सांडपाणी मिसळून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच त्यासंबंधी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीपूर्वी आमदार पाटील, महापौर आजरेकर, आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांसमवेत शहरातील राबाडे नाला, दुधाळी नाला, जयंती नाला यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. कसबा बावडा येथील ‘एसटीपी’चीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, गटनेते शारंगधर देशमुख, परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, महिला बालकल्याण सभापती शोभा कवाळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
 

 

Web Title: Protect contaminated sewage mixes into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.