करवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 07:06 PM2021-07-31T19:06:01+5:302021-07-31T19:08:52+5:30

Kolhapur Flood : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी शनिवारी केले.

The process of Panchnama is fast | करवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगाने

करवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगाने

Next
ठळक मुद्देकरवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगानेपूरग्रस्तांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत : शीतल मुळे-भामरे

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी शनिवारी केले.

पुरामुळे बाधित झालेल्या करवीर तालुक्यातील छोटे गॅरेज, उद्योग व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक, इतर पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच मयत व वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पथकांकडून केले जात आहेत.

या पथकाला आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास पंचनामे वेळेत पूर्ण होऊन शासनाकडून दिली जाणारी मदत व अनुदान लवकरात लवकर मिळेल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कागदपत्रे तयार ठेवा
- रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स, घरठाण पत्रक, ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड.

पंचनाम्यासाठी येथे संपर्क साधा

१ ) सानुग्रह, निर्वाह भत्त्याचे अनुदान, घराची, गोठ्याची पडझड, व्यावसायिक - शहर : कोल्हापूर मनपा, करवीर : कसबा बावडा, जाधववाडी : उचगाव तलाठी कार्यालय.
ग्रामीण भागात : गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, घर/ गोठा पडझडीसाठी बांधकाम विभाग पंचायत समिती करवीर,
२) कृषी- शहर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच करवीर, कसबा बावडा, जाधववाडी उंचगाव कृषी सहायक व तलाठी कार्यालय.
ग्रामीण भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर तसेच संबंधित गावचे कृषी सहायक कार्यालय व तलाठी कार्यालय
३) पशुधन- शहरी भाग व ग्रामीण भाग : पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती करवीर, गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय.

Web Title: The process of Panchnama is fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.