प्रवीण चौगुले यांची सांगली, सांगलीचे श्रीकांत पिंगळे यांची कोल्हापुरात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 07:09 PM2020-10-31T19:09:12+5:302020-10-31T19:11:04+5:30

Policeofficers, Transfar, kolhapurnews कोल्हापूर परिक्षेत्रातील एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा ९१ जणांच्या बदल्या शनिवारी झाल्या.

Praveen Chowgule was transferred to Sangli and Shrikant Pingale of Sangli was transferred to Kolhapur | प्रवीण चौगुले यांची सांगली, सांगलीचे श्रीकांत पिंगळे यांची कोल्हापुरात बदली

प्रवीण चौगुले यांची सांगली, सांगलीचे श्रीकांत पिंगळे यांची कोल्हापुरात बदली

Next
ठळक मुद्देप्रवीण चौगुले यांची सांगली, सांगलीचे श्रीकांत पिंगळे यांची कोल्हापुरात बदली १४ पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक, ४७ उपनिरीक्षकांच्या कोल्हापूर परिक्षेत्रात बदल्या

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा ९१ जणांच्या बदल्या शनिवारी झाल्या.

शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांची सांगलीला, नवराथ घोगरे यांची सातारा, तर सागंलीतील पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळेंची कोल्हापूरला नियुक्ती झाली. एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या १४ पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक, ४७ पोलीस उपनिरीक्षक पदांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी जारी केले. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांची सातारा येथे, तर सांगलीच्या स्नेहा गिरी व सोलापूरचे विजय पाटील यांची कोल्हापुरात बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या कोल्हापुरातील अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदलीचे ठिकाण): सहायक पोलीस निरीक्षक - शाहूपुरीचे रविराज फडणीस (सांगली), शशिकांत सावंत (पुणे ग्रामीण), आरती नांद्रेकर (सातारा). दरम्यान सातारा येथील सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पुणे ग्रामीण येथील सागर पाटील, सांगलीचे उमेश दंडिले, सांगलीचे संजय क्षीरसागर यांची कोल्हापुरात बदली झाली.

जिल्ह्यातील उपनिरीक्षकांमधील जुना राजवाड्याचे संजय नागरगोजे यांची पुणे ग्रामीण, शहर वाहतूक शाखेच्या अनिता मेणकर, सचिन मद्वाना यांची सांगली, युवराज सूर्यवंशींची सोलापूर ग्रामीणला बदली झाली.
सांगलीतील सीमा बडे, विष्णू माळी, प्रदीप चौधरी, पुणे ग्रामीणचे सोमनाथ वाघमोडे यांची कोल्हापुरात बदली झाली.

यांना मिळाली मुदतवाढ....

कोल्हापुरातील सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, मंगेश देसाई, सरोजिनी चव्हाण तसेच पोलीस उपनिरीक्षक शाम देवणे यांना २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
 

Web Title: Praveen Chowgule was transferred to Sangli and Shrikant Pingale of Sangli was transferred to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.