शेतकरी कुटुंबातील पी.आर.पाटील ​​​​​​​आय.पी.एस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:41 PM2020-10-01T12:41:53+5:302020-10-01T16:30:26+5:30

सरूड (ता. शाहूवाडी ) येथील पी. आर. पाटील यांची भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधीक्षक पदी (आय.पी.एस) निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने सरुड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गेला खोवला आहे

Police officer P.R. Patil | शेतकरी कुटुंबातील पी.आर.पाटील ​​​​​​​आय.पी.एस

शेतकरी कुटुंबातील पी.आर.पाटील ​​​​​​​आय.पी.एस

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी कुटुंबातील पी.आर.पाटील ​​​​​​​आय.पी.एसपोलिस अधिकाऱ्यांच्या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

अनिल पाटील 

सरूड :  सरूड (ता. शाहूवाडी ) येथील पी. आर. पाटील यांची भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधीक्षक पदी (आय.पी.एस) निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने सरुड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गेला खोवला आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षक, तहसिलदार, पोलिस उपअधिक्षक, पोलिस उपायुक्त ते पोलिस अधिक्षक (आय.पी.एस) पदापर्यंतचा त्यांचा २३ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे . पी. आर. पाटील हे सध्या कोल्हापूर नागरी हक्क सरंक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सरुड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पी. आर. पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरुड येथे तर महाविधालयीन शिक्षण मलकापूर येथे झाले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली. दोनच वर्षामध्येच त्यांनी विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश सपांदन केले. त्यांनतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेतुन १९९८ मध्ये त्यांची तहसिलदारपदी निवड झाली. पंरतू एवढयावर समाधान न मानता मुंबई उपायुक्त विश्वास नांगरे - पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन १९९९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतुनच त्यांनी पोलिस उपअधिक्षकपदाला गवसणी घातली.

प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून प्रथम त्यांची जळगाव येथे नेमणूक झाली. प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर अचलपूर (जि. अमरावती ) येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. अचलपूर बरोबरच त्यांनी पंढरपूर,पुणे ग्रामीण ( राजगुरुनगर) येथेही पोलिस उपअधिक्षक म्हणून उत्तम सेवा बजावली. त्यांनतर पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

पुण्याहुन त्याची नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. त्यांनतर त्यांची कोल्हापूर नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली. गेल्या दिड वर्षापासून ते या पदावर कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. येथे सेवा बजावत असतानाच पाटील यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये पोलिस अधिक्षकपदी (आय.पी.एस) म्हणून निवड झाली आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना मुंबईचे उपायुक्त विश्वास नांगरे - पाटील, पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

सरूड, पोलिस अधिकाऱ्यांच्या गावातील पी.आर. पाटील

सरूड गाव हे पोलिस अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. पी.आर. पाटील यांच्या स्पर्धा परिक्षेतील यशानंतरच गावात किंबहुना शाहूवाडी तालुक्यात खऱ्या अर्थाने स्पर्धा परिक्षेचे वारे वाहु लागले. पी. आर. पाटील यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तसेच परिसरातील अनेक युवकांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले आहे.

Web Title: Police officer P.R. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.