शिरोलीसह शिवाजी पुलावर प्लाय ओव्हर उभारणार  : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 08:01 PM2021-07-27T20:01:54+5:302021-07-27T20:04:29+5:30

Kolhapur Flood AjitdadaPawar Kolhapur : पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर वाहतूक ठप्प होते, त्याचा मदत कार्यावर परिणाम होतो. यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकाऱ्यातून शिरोली, शिरोळ व शिवाजी पूल येथे पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, असे प्लाय ओव्हर उभे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

Plyover to be erected on Shivaji bridge with Shiroli: Ajit Pawar | शिरोलीसह शिवाजी पुलावर प्लाय ओव्हर उभारणार  : अजित पवार

शिरोलीसह शिवाजी पुलावर प्लाय ओव्हर उभारणार  : अजित पवार

googlenewsNext
ठळक मुद्देशिरोलीसह शिवाजी पुलावर प्लाय ओव्हर उभारणार  : अजित पवार नुकसानीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच आर्थिक पॅकेज

कोल्हापूर : पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर वाहतूक ठप्प होते, त्याचा मदत कार्यावर परिणाम होतो. यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकाऱ्यातून शिरोली, शिरोळ व शिवाजी पूल येथे पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, असे प्लाय ओव्हर उभे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. नुकसानीबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची कोल्हापूर शहरात पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसमवेतील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापुरातील अनेक तालुक्यात हंगामातील पाऊस तीन दिवसांत कोसळल्याने शेती, रस्ते, पूल, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरडी कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा काळातही पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी झोकून देऊन काम केले.

आता पाणी ओसरल्यानंतर साफ-सफाईसह इतर कामांना वेग आला आहे. पुराचे पाणी वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील प्रामुख्याने ठिकठिकाणी ब्रिटिशकालीन मोऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये कमी व्यासाच्या पाइपमधून पाणी पुढे सरकत नसल्याने त्या तुंबतात. यासाठी बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण व मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पावसाळ्यानंतर येथे बॉक्स अथवा स्लॅबच्या मोठ्या मोऱ्या करण्याचा निर्णय घेतला जाईल. पुराच्या पाण्याने विद्युत खांब मोडल्याने वीज पुरवठा खंडित झाला तिथे प्राधान्याने पूर्ववत होत आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत. या सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 

Web Title: Plyover to be erected on Shivaji bridge with Shiroli: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.