झाडे लावा पैसे जिरवा प्रवृत्ती बोकाळली-:हातकणंगले तालुक्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:50 AM2019-06-13T00:50:48+5:302019-06-13T00:53:13+5:30

वन विभागाने झाडे लावण्याच्या खड्ड्यापासून माती, खत भरण्यापर्यंत आणि रोप लागवडीसाठी अधिकारी ते वनरक्षक यांनी आपल्याच पै-पाहुण्यांना दिलेली ठेकेदारी, मरअळीच्या नावाखाली तेच खड्डे तीच झाडे, संरक्षक चरीचे फक्त कागदी घोडे, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी गतवर्षाच्या झाडाचा

 Planting of trees, money and spirit; - Pictures of Hatkanangale taluka | झाडे लावा पैसे जिरवा प्रवृत्ती बोकाळली-:हातकणंगले तालुक्यातील चित्र

आळते डोंगरावर जे.सी.बी.च्या सहाय्याने झाडे लावण्यासाठी खुदाई करण्यात आलेले खड्डे.

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा वन अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांच्या कामाची पडताळणी; गतवर्षीच्या वृक्षारोपणाचा बोजवारा

दत्ता बिडकर ।
हातकणंगले : वन विभागाने झाडे लावण्याच्या खड्ड्यापासून माती, खत भरण्यापर्यंत आणि रोप लागवडीसाठी अधिकारी ते वनरक्षक यांनी आपल्याच पै-पाहुण्यांना दिलेली ठेकेदारी, मरअळीच्या नावाखाली तेच खड्डे तीच झाडे, संरक्षक चरीचे फक्त कागदी घोडे, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी गतवर्षाच्या झाडाचा उडालेला बोजवारा यामुळे शासनाची ‘झाडे लावा पैसे जिरवा’ योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मात्र, जिल्हा वन अधिकाऱ्यांकडून गेली तीन महिने ठेकेदारांची कामे आणि झालेल्या कामाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतल्याने पावसाळ्यापूर्वीच वृक्ष लागवडीचा फज्जा उडाला आहे.

तालुक्यामध्ये शासनाच्या वृक्ष लागवडीसाठी प्रादेशिक वनविभागाकडून हातकणंगले आणि नरंदे परिमंडलाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. तालुक्यातील ९ गावांमधील ११० हेक्टर क्षेत्रावर १ लाख ३१ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यासाठी शासनाकडून ३६ लाख २६ हजारांचा निधी मिळणार आहे. प्रादेशिक वनविभागाची डोंगरमाथ्यावर आणि डोंगर उतारावर झाडे लावण्याची तयारी जोरदार सुरू आहे. नंरदे आणि हातकणंगले परिमंडलांतर्गत नरंदे २० हेक्टर, हातकणंगले १0 हेक्टर, मुडशिंगी १५ हेक्टर, माले १५ हेक्टर, तासगाव १५ हेक्टर, मनपाडळे १० हेक्टर, अंबपवाडी ५ हेक्टर, पारगाव १५ हेक्टर आणि तारदवळ ५ हेक्टर असे तालुक्यामध्ये ११० हेक्टरवर १ लाख ३१ हजार ७०५ झाडे लावण्याचे नियोजन केले आहे.

यासाठी जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने खड्डे मारण्याचे काम पूर्ण झाले आहे. वन विभागाच्या अंदाजपत्रकानुसार खड्डे मारणे, झाड लावणे आणि त्याचे संगोपन-संरक्षण करण्यासाठी शासनाकडून प्रती झाड ३५ रुपयांपासून ५२ रुपयांपर्यंत ठेकेदाराला दिले जातात. याशिवाय झाडांना पाणी देण्याचा निधी वेगळा दिला जातो. हातकणंगले तालुक्यामध्ये वनविभागाची खड्डे मारण्यापासून खत, माती आणि रोप लागणाºया सर्व प्रकारच्या कामाची ठेकेदारी वनअधिकारी ते वनरक्षकाच्या नातेवाईक पै-पाहुणे यांनाच देण्यात आल्यामुळे ‘झाडे लावा, पैसे जिरवा’ ही शासन योजना तालुक्यामध्ये जोर धरली आहे.

वन विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाºयांचे प्रताप जिल्हा वन अधिकाºयांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी या संपूर्ण ठेकेदारीची आणि कामाची पडताळणी सुरू केली आहे. कामाची बिले थांबवली असल्यामुळे तालुका वनविभाग गोंधळून गेला आहे.

तालुक्यामधील आळते डोंगर ते वाठारपर्यंतच्या २०१६-२०१७ या वर्षी चार कोटी वृक्ष लागवड योजनेमधील मर लागलेली ३१२५ झाडे गतवर्षी वन विभागाकडून नव्याने लावली, मात्र चालू वर्षीचा कडक उन्हाळा यामुळे ती ही जगण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांचे मत आहे.

तालुक्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडून २०१८-२०१९ या वर्षात कासारवाडी १० हेक्टर, तळसंदे २१ हेक्टर, मजले ७ हेक्टर असे ३८ हेक्टरवर ४२२१८ झाडे लावणेत आली. यापैकी १० ते १५ टक्के झाडांना मरअळी लागल्याचे सामाजिक वनीकरणचे मत आहे. तर चालू वर्षी २०१९-२० करिता सामाजिक वनीकरण विभागाकडून कासारवाडी - २० हेक्टर, टोप - २० हेक्टर, किणी - ५ हेक्टर, तासगाव -५ हेक्टर आणि आळते - १० हेक्टर असे ६० हेक्टर क्षेत्रावर हेक्टरी २५०० झाडाप्रमाणे १ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सामाजिक वनीकरण विभागाला खड्डे मारणे, रोप लागण करण्यासाठी आणि संरक्षणासाठी प्रती झाड २७ रु. प्रमाणे गतवर्षी सामाजिक वनीकरण विभागाला ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला होता. तर झाडांना पाणी देणे आणि संरक्षक चरीसाठी प्रती झाड ११ रुपयांचा निधी मिळतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही झाडे जगण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याने झाडे प्रतीवर्षी लावली जातात. त्याच खड्ड्यामध्ये मरअळीच्या नावाखाली पुन्हा पुढच्या वर्षी झाडे लावली जातात. २०१९-२०मध्ये सामाजिक वनीकरण १ लाख ५० हजार झाडे लावणार असल्यामुळे निधीचा पुरवठा होऊन ही झाडे लावणे आणि झाडे जगणेचा ताळमेळ वन विभागालाच लागत नाही.

वृक्ष लागवडीबरोबरच वनविभागाकडून माती बंधारे, वनतळी, लुज बोल्डर, खोल समतल चर यासाठी लाखो रुपयांचा निधी जलयुक्त शिवार या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडींतर्गत निधी मिळूनही प्रादेशिक वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रतीवर्षी काम केले जाते. मात्र त्यांचे रिझल्ट किती याचा विचारच होत नसल्यामुळे प्रत्येक वर्षी मरअळीचे प्रमाण वाढतच आहे.

ठेकेदारीचा प्रश्न ऐरणीवर
प्रादेशिक वनविभागाकडून २०१६-१७ च्या वृक्ष लागवडीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला होता. यामध्ये तालुका वन अधिकारी यांच्यासह दोन वनरक्षकांची खातेनिहाय चौकशी करुन निलंबनाची कारवाई केली होती. हे प्रकरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलेच गाजले होते. यावरुन वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी धडा घेतील असे वाटत होते. मात्र चालू वर्षी पुन्हा ठेकेदारीचा प्रश्न वृक्ष लागवडीच्या मुळावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूर -सांगली रस्त्याच्या दोन्ही बाजूला शिरोली ते जयसिंगपूर दरम्यान संजय घोडावत उद्योग समूहाने ८० हजार झाडे लावून ती जगवली आहेत. खासगी समूहाकडून एवढ्या मोया प्रमाणात वृक्ष लागवडीमध्ये योगदान देण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे या त्याच्या सामाजीक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Web Title:  Planting of trees, money and spirit; - Pictures of Hatkanangale taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.