जनतेचा श्रावणबाळ, तीच मला गुलाल लावणार -- हसन मुश्रीफ : रोखठोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:00 AM2019-10-19T01:00:53+5:302019-10-19T01:00:58+5:30

माझ्या दारात आलेला माणूस, कधीही त्याला काही मदत झाली नाही म्हणून रिकाम्या हाताने परत गेला नाही. सामान्य जनतेशी ‘श्रावणबाळ’ म्हणून असलेली नाळच पाचव्यांदा विजयाचा गुलाल लावेल, असा विश्वास कागलचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

People's hearing, that is what will make me a slave | जनतेचा श्रावणबाळ, तीच मला गुलाल लावणार -- हसन मुश्रीफ : रोखठोक

जनतेचा श्रावणबाळ, तीच मला गुलाल लावणार -- हसन मुश्रीफ : रोखठोक

googlenewsNext
ठळक मुद्दे लोकप्रेम हीच चांगल्या कामाची पोचपावती; माझी लढत शिवसेनेशीच; विजयाचा आत्मविश्वास

विश्र्वास पाटील।
कोल्हापूर : सामान्य माणसांच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून असणाऱ्या अपेक्षांची पूर्ती मी केली आहे. या अपेक्षांना कायमच पुरून उरण्याचा प्रयत्न मी केला आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

ते म्हणाले, सकाळी सहा वाजल्यापासून मी लोकांसाठी उपलब्ध असतो. माझा फोन कधीही नॉट रिचेबल नसतो. आपल्या दारात आलेला माणूस कोणत्या राजकीय गटाचा आहे, हे मी कधीच पाहत नाही. प्रश्न घेऊन आलेला माणूस परत जाताना हसत गेला पाहिजे, यासाठी मला जेवढी करता येईल तेवढी मदत मी करतो. ग्रामपंचायतीला सलग दोन वेळा निवडून आला आणि पुन्हा निवडणुकीस उभा राहिला तरी लोकांमध्ये नाराजी असते. कागलच्या जनतेने मला सलग २० वर्षे आमदार केले. त्यांतील १४ वर्षे जनतेच्या आशीर्वादामुळेच मी मंत्री होतो. तरीही मी सहाव्यांदा निवडणुकीस अर्ज भरताना लोकगंगेला महापूर आला. हे लोकप्रेमच माझ्या चांगल्या कामाची पोहोचपावती आहे. त्याच बळावर मला विजयाचा आत्मविश्वास वाटतो.’

गेली निवडणूक मी चार प्रमुख सूत्रांवर लढविली. त्यामध्ये विकास, बेरोजगाऱ्यांच्या हातांना काम, दीनदलित, गरीब लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे व लोकसंपर्क याचा समावेश होता. या चारीही बाबतींत नजरेत भरण्याइतके काम करू शकलो. गावागावांना जोडणारे रस्ते केले, किमान ५०० देवालये बांधली. व्यायामशाळा, दलितवस्ती सुधारणा केली. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार मिळाला.मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून गेली १२ वर्षे आम्ही निरंतर राज्य, लोकसेवा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देत आहोत. त्यातून अनेक मुलांचे भवितव्य घडले आहे. तालुक्यातील गोरगरीबांच्या आजारपणांमध्ये त्यांच्या हाकेला धावून गेलो आहे.

मुळात कुणी आजारीच पडू नये; परंतु पडलेच तर माझ्याकडे या. त्यांच्यावरील सर्व उपचारांची जबाबदारी मी घेतली आहे. कर्ता पुरुष या वडिलकीच्या नात्याने अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी मी पहाडासारखा उभा राहिलो आहे. त्यामुळेच कुणी कितीही वल्गना केल्या, शड्डू मारले तरी लोक माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री वाटते, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

विजयाच्या दाव्याची कारणे

  • तिरंगी लढतीचा फायदा मला होणार आहे. गेल्या निवडणुकीत मी व स्वर्गीय नेते विक्रमसिंह घाटगे एकत्र होतो. कागलमध्ये आम्हा दोघांचेच प्रबळ गट असतानाही मला कागलमधून फक्त पाच हजारांचे मताधिक्य मिळाले. याचा अर्थ घाटगे गटाची मते त्यावेळी संजय घाटगे यांनाच गेली होती, तरीही मी जिंकलो होतो.
  • या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची एकजूट झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाठबळ आहे. आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’च्या माध्यमातून पाठिंबा दिल्याने त्याचाही फायदा होणार आहे. गडहिंग्लजला जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे माझा विजय सोपा झाला आहे.
  • लोकांमध्ये कर्जमाफीत सरकारने फसवणूक केल्याची नाराजी आहे. रेशनिंग नीट मिळत नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. यामुळे सरकारविरोधातील रोष निवडणुकीत व्यक्त होईल.


माझी लढत शिवसेनेच्या उमेदवाराशीच असून विरोधकांमध्ये कोण दुसऱ्या क्रमांकावर, कोण तिस-या क्रमांकावर राहणार यासाठीच स्पर्धा लागली आहे.

 

Web Title: People's hearing, that is what will make me a slave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.