The people of Kagal will send you to the temple of democracy, happy fountain of Fadnavis | कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, फडणवीस यांच्या समरजित यांना शुभेच्छा
कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, फडणवीस यांच्या समरजित यांना शुभेच्छा

ठळक मुद्देकागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समरजित यांना शुभेच्छा कागलमध्ये विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ््याचे अनावरण : विधानसभेचे शक्तीप्रदर्शन

कागल/कोल्हापूर : कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, अशा शब्दात म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागल येथील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. या निवडणूकीत जनता विरोधकांना नक्कीच घरी बसवेल असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला.

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण समारंभानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

याच समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल मतदार संघातून समरजित घाटगे यांची युतीचे उमेदवार म्हणून घोषणा करावी, आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यांनी निवडून आणतो अशी ग्वाही दिली. यावर लोकांनी टाळ््यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला.

 


Web Title: The people of Kagal will send you to the temple of democracy, happy fountain of Fadnavis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.