‘आशा’ कर्मचाऱ्यांचे मानधन ताबडतोब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:00 AM2020-12-05T05:00:02+5:302020-12-05T05:00:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील ‘आशा’ कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने ठराव केलेले मानधन आजतागायत दिले नाही. ते १२ डिसेंबरपर्यंत जमा ...

Pay ‘Asha’ employees immediately | ‘आशा’ कर्मचाऱ्यांचे मानधन ताबडतोब द्या

‘आशा’ कर्मचाऱ्यांचे मानधन ताबडतोब द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील ‘आशा’ कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने ठराव केलेले मानधन आजतागायत दिले नाही. ते १२ डिसेंबरपर्यंत जमा करावे; अन्यथा काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने देण्यात आला. संघटनेने शुक्रवारी पालिकेसमोर निदर्शने करून नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून शहरातील ११६ ‘आशा’ कर्मचारी काम करीत आहेत. काहीजणांना कोरोनाची लागण होऊन गेली. जोखमीचे काम असल्याने नगरपालिकेने ठराव करून सर्व आशा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती; परंतु आजतागायत कोणालाही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे संघटनेच्या वतीने नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची भेट घेतली. सोमवार (दि. ७) पर्यंत रक्कम खात्यावर जमा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Pay ‘Asha’ employees immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.