कोल्हापूर : भारतातील प्रमुख कंझ्युमर ड्युअरबल ब्रँड एलजी इलेक्ट्रॉनिक्सने प्रजासत्ताक दिनाच्या आधी ‘करसलाम’ उपक्रम राबविला. ‘एलजी’ने सशस्त्र सैन्य ध्वज दिन फंडामध्ये एक कोटी रुपयांचे योगदान दिले. शूर सैनिकांना समर्पित असलेल्या ‘करसलाम’ उपक्रम गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू झाला. २०२० मध्ये ‘एलजी’ने सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली. या रकमेचा उपयोग माजी सैन्य दलातील सैनिक आणि संरक्षण दलांच्या हुतात्म्यांच्या मुलींना शिक्षण देण्यासाठी केला जात आहे. एक जबाबदार ब्रँड म्हणून आम्ही अर्थपूर्ण सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी वचनबध्द आहोत. ‘करसलाम’ या तत्त्वाचा विस्तार असल्याचे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे एमडी यंग लक किम यांनी सांगितले. सैन्य दलाच्या ध्वजदिन निधीची स्थापना संरक्षण दलाच्या माजी लष्करी जवानांच्या कल्याण आणि पुनर्वसनाच्या गरजा भागविण्यासाठी केली आहे. आम्हाला ‘करसलाम’सारख्या इतर अनेक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे केएसबीचे सचिव एअर कमोडोर बी. अहलुवालिया यांनी सांगितले.
‘एलजी’कडून ‘करसलाम’अंतर्गत एक कोटीची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST