समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 03:28 PM2020-07-24T15:28:02+5:302020-07-24T15:29:43+5:30

ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.

Not only the committee but also the meeting is being held - Raju Shetty | समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी

समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी

Next
ठळक मुद्देसमितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच केला प्रश्न

कोल्हापूर : ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द केली असल्याची घोषणा करण्यात आली.

ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक आज मुख्य सचिव संजयकुमार यांनी बोलावली आहे. यावर गुरुवारी शेट्टी यांनी आक्षेप घेत मुख्य सचिवांना पत्र पाठवून बैठक रद्द करा, समिती सदस्य नियुक्तीनंतरच बैठक घ्या अशी विनंती केली. त्यानंतर यंत्रणा वेगाने हलली. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर या बैठकीबाबत चर्चा झाली.

एफआरपी कायदा लागू झाल्यापासून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील साखर आयुक्तांसह शेतकरी, साखर कारखानदार प्रतिनिधी यांचा प्रमुख सहभाग असलेली ऊस दर नियंत्रण समितीच गळीत हंगामाचा निर्णय घेते.

गेल्या वर्षी स्थापन झालेली समिती मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आली आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या समितीची स्थापना होणे आवश्यक होते. तथापि, कोरोनामुळे ही समिती अजूनही स्थापन होऊ शकलेली नाही.

या वर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन सरकारने चालविले आहे; पण अजून समितीही नाही आणि बैठकही नाही अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आज बैठकीचे नियोजन केले होते.


शेट्टी यांनी उपस्थित केलेले प्रश्न

1. शेतकरी आणि साखर कारखानदार यांचे प्रतिनिधी नसल्याने चर्चा कुणाशी करणार
2. थकीत एफआरपीवर निर्णय कोण घेणार
3. ७०:३० च्या फॉर्म्युल्यावर काय निर्णय घेणार


अजून अशासकीय सदस्यांची नेमणूक झालेली नसताना केवळ शासकीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परस्पर निर्णय घेणे चुकीचे आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.
- राजू शेट्टी, माजी खासदार

Web Title: Not only the committee but also the meeting is being held - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.