जानेवारीपर्यंत हिरण्यकेशीवर उपसाबंदी नाही,गडहिंग्लज येथील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 03:03 PM2020-10-30T15:03:26+5:302020-10-30T15:06:05+5:30

River, MLA, Water, kolhapurNews चित्री लाभक्षेत्रातील संपूर्ण शेतीला पाणी मिळण्यासाठी रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होणे आवश्यकआहे. ते मार्गी लावून आजरा व गडहिंग्लज तालुक्यांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.

No subdivision on Hiranyakeshi till January, decision at the meeting at Gadhinglaj | जानेवारीपर्यंत हिरण्यकेशीवर उपसाबंदी नाही,गडहिंग्लज येथील बैठकीत निर्णय

गडहिंग्लज येथे आयोजित बैठकीत आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सभापती रुपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, कार्यकारी अभियंता स्मिता माने उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजानेवारीपर्यंत हिरण्यकेशीवर उपसाबंदी नाही,गडहिंग्लज येथील बैठकीत निर्णयपाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्नशील :राजेश पाटील

गडहिंग्लज : चित्री लाभक्षेत्रातील संपूर्ण शेतीला पाणी मिळण्यासाठी रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होणे आवश्यकआहे. ते मार्गी लावून आजरा व गडहिंग्लज तालुक्यांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.

हिरण्यकेशी नदीवरील उपसाबंदीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. येथील पाटबंधारे कार्यालयात ही बैठक झाली.चित्रीमध्ये उपलब्ध पाणी साठा विचारात घेता जानेवारीपर्यंत उपसाबंदीची गरज नाही.जानेवारीत पुन्हा बैठक घेऊन उपसाबंदीचे नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पाटील म्हणाले, आंबेओहोळ, सर्फनाला व किटवडे हे प्रकल्प मार्गी लागल्यानंतरच आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.तसेच आजर्‍यातील कोल्हापूर पध्दतीच्या दोन बंधार्‍यांसाठीदेखील आपण प्रयत्नशील आहोत. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही उपसाबंदीचे योग्य नियोजन करावे.

संकेश्वर कारखान्याचे मळीमिश्रित नदीत मिसळू नये,यासाठी कारखान्याला सूचना द्यावी,असेही आमदार पाटील यांनी सांगितले. आजऱ्याचे सभापती उदय पोवार म्हणाले, हिरण्यकेशी नदी पात्राचे खोलीकरण करावे.आजरा तालुक्यातील लाभक्षेत्रात उपसाबंदी नको. माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, खणदाळ बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी करू नये.

नांगनूरचे उपसरपंच विकास मोकाशी म्हणाले, कर्नाटक हद्दीतील नव्या गोटूर बंधार्‍याची चौकशी करावी.
कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी चित्रीच्या पाण्याच्या यावर्षीच्या नियोजनाबाबतची रुपरेषा सांगितली.
बैठकीस सभापती रुपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी,अभय देसाई, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, बनश्री चौगुले, इंदूमती नाईक, उपअभियंता तुषार पोवार उपस्थित होते.

संबंधितांवर कारवाई करा

उपसाबंदी कालावधीत बंधार्‍याच्या फळ्या बेकायदा काढून पाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी केली.

 

Web Title: No subdivision on Hiranyakeshi till January, decision at the meeting at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.