साताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:33 PM2019-11-01T16:33:36+5:302019-11-01T16:48:33+5:30

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, ...

No plastic message from the rang in Satara | साताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेश

साताऱ्यातील जयहिंद ग्रुपने दीपोत्सव साजरा करताना यावर्षी नो प्लास्टिकचा संदेश रांगोळीतून नागरिकांना दिला. (छाया : जावेद खान)

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेशजयहिंदचा तेरावा दीपोत्सव : ग्रुपकडून २००७ पासून अनोखा उपक्रम सुरू

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, निसर्गाची हानी याचा कोणीही विचार करत नाही. अशातूनच साताऱ्यातील शनिवार चौकामधील जयहिंद ग्रुपने प्लास्टिकचे धोके दाखवण्यासाठी नो प्लास्टिकचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती.

साताऱ्यातील या जयहिंद ग्रुपने २००७ पासून या दिपोत्सवाची सुरुवात केली. यंदाचे हे १३ वे वर्ष होते. तर दीपोत्सवाच्या निमित्ताने वेताळबा मैदान येथे भव्य अशी रांगोळी साकारण्यात येते. त्यावर पणत्या ठेऊन दिपोत्सव साजरा केला जातो.

येथे साकारलेली रांगोळी ही वेगळी दिशा देऊन जाते. कारण, ती फक्त रांगोळी नसून त्यातून वेगवेगळे संदेश लिहिले जातात. हे या दिपोत्सवाचे वैशिष्टे असते. गेल्या बारा वर्षांत फटाके मुक्त दिवाळी, तापमान वाढ, कास पठार प्रदूषण, स्त्री भृण हत्या, भ्रष्टाचार, अंधश्रध्दा, मंगळयान मोहीम या सारख्या विषयावर रांगोळी साकारण्यात आल्या होत्या.

नुकतेच पर्यावरणाला अतिशय हानीकारक ठरणाºया प्लास्टिकवर सरकारने बंदी आणण्याचा एक चांगला निर्णय घेतला. परंतू लोकांनी ही प्लास्टिक बंदी मनापासून स्विकारुन अमलात आणली पाहीजे. यासाठी जनजागृती व्हावी म्हणून या वर्षी नो प्लास्टिक या विषयावर महारांगोळी साकारण्यात आली होती. याच्या सजावटीसाठी सुमारे एक हजार पणत्या प्रज्वलीत करण्यात आलेल्या.

यावेळी पहिल्या दिपोत्सवापासून सक्रीय असलेले बिपीन दलाल, निलेश पंडीत, निलेश धबधबे यांच्यासह अश्विन पोतदार, आकाश धबधबे, अशुतोष माने, विवेक धबधबे, सौरभ वांकर, निशांत पंडीत, सिध्दार्थ धबधबे, हर्ष धबधबे, रितेश वांकर, तनिश बेंद्रे, आयुश बारवडे, रोहीम इब्रामपुरे आदींनी विशेष परीश्रम घेतले.
 

 

 

Web Title: No plastic message from the rang in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.