Lok Sabha Election 2019 Results :सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राबले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:17 PM2019-05-23T21:17:40+5:302019-05-23T21:27:02+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ९९० अधिकारी व कर्मचाºयांचे हात राबले. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरातील शासकीय गोदाम येथे सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील

Nearly one thousand officers, employees' | Lok Sabha Election 2019 Results :सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राबले हात

Lok Sabha Election 2019 Results :सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राबले हात

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकाºयांकडून मतमोजणी केंद्रांची पाहणीकोल्हापूर मतदारसंघातील मतमोजणीचे चित्र

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ९९० अधिकारी व कर्मचाºयांचे हात राबले. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरातील शासकीय गोदाम येथे सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील उघडले. त्यानंतर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांनी सर्व मतमोजणी केंद्रांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.

सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील उघडले
जिल्हाधिकारी दौलत देसाई, चंदगड, राधानगरी मतदारसंघाच्या निरीक्षक अलका श्रीवास्तव, कागल, कोल्हापूर दक्षिणच्या निरीक्षक हीना नेतम, करवीर व कोल्हापूर उत्तरच्या निरीक्षक नंदा कुशरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे प्रतिनिधी नगरसेवक सत्यजित कदम, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचे प्रतिनिधी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, आदींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील उघडण्यात आले.

‘कोल्हापूर उत्तर’ची मतमोजणी अर्धा तास उशिरा
शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरातील ‘ए’ गोदाम या इमारतीत चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांची, ‘सी’ गोदाम येथे करवीर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली, तर ‘डी’ गोदाम येथे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची मतमोजणी साडेआठ वाजता सुरू झाली. या मतदारसंघात फेºया कमी असल्याने अर्धा तास उशिरा मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय प्रत्येकी वीस टेबलवर मतमोजणी झाली. यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात १९, राधानगरीमध्ये २२, कागलमध्ये १८, कोल्हापूर दक्षिणमध्ये १७, करवीरमध्ये १८ व कोल्हापूर उत्तरमध्ये १६ फेºया झाल्या. एका फेरीला सरासरी अर्धा तास इतका वेळ लागला.

सुमारे हजार अधिकारी, कर्मचाºयांचे राबले हात
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण ९९० अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र राबले. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ, चंदगडच्या सहायक निवडणूक अधिकारी विजया पांगारकर, राधानगरीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी, कागलचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, कोल्हापूर दक्षिणचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे, करवीरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, कोल्हापूर उत्तरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्यासह मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, रांग अधिकारी, अतिरिक्त सूक्ष्म निरीक्षक, टपाली मतमोजणी पर्यवेक्षक, टपाली मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, संगणक आॅपरेटर, आदींचा समावेश होता.

दुपारी चारपर्यंत ‘ईव्हीएम’ची मतमोजणी पूर्ण
मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. विधानसभानिहाय फेºया पूर्ण होऊन जवळपास दुपारी चारपर्यंत ‘ईव्हीएम’ची मतमोजणी पूर्ण झाली; परंतु ती ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्या मोजल्याशिवाय जाहीर करण्यात आली नाही. यानंतर केंद्रनिहाय ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्यांची मोजणी सुरू करण्यात आली. ती रात्रीपर्यंत सुरू होती. एका केंद्राला सरासरी पाऊण तासाचा कालावधी लागला.

सैनिकांची मतमोजणी स्कॅनिंगऐवजी पोस्टल पद्धतीनेच
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत पोस्टल मतांच्या मोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यामध्ये प्रथम निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांची मते मोजण्यात आली. ही प्रक्रिया दुपारी दोन वाजता पूर्ण झाली. त्यानंतर तीनच्या सुमारास सैनिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सैनिकांच्या मतपत्रिका या ‘ईटीपीडीएस’ प्रणालीनुसार असल्याने त्याचे लखोट्यापासून मतपत्रिकेच्या बारकोडनुसार स्कॅनिंग करून मोजणी केली जाणार होती; परंतु देशपातळीवरच सर्व्हरला प्रॉब्लेम आल्याने निवडणूक आयोगाने दुपारी पोस्टल पद्धतीनेच या मतपत्रिकांची मोजणी करावी असे आदेश निवडणूक विभागाला दिले. त्यानुसार त्या पद्धतीनेच सायंकाळपर्यंत ही मोजणी सुरू होती.
 

Web Title: Nearly one thousand officers, employees'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.