माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 02:53 PM2020-09-29T14:53:45+5:302020-09-29T14:55:30+5:30

माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार आहे. त्याअंतर्गत व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

My family, my responsibility plan Kolhapur Chamber will implement competently | माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार

 कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते आस्थापनांत स्टीकर चिकटवून अनावरण करण्यात आले. यावेळी शेजारी संजय शेटे, शिवाजीराव पोवार, हरिभाई पटेल, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमाझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार व्यापारी, ग्राहकांचे प्रबोधन करणार :संजय शेटे

कोल्हापूर : माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार आहे. त्याअंतर्गत व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमवेत ह्यकोल्हापूर चेंबरह्ण आणि संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दि. १७ सप्टेंबरला वेबिनार सभा झाली. त्यात तोंडाला मास्क नाही तर दुकानात प्रवेश नाही.

दुकानात योग्य सामाजिक अंतर व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटाईज करणे या त्रिसूत्रीकरणाचा अवलंब केला, तर कोरोनावर मात करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेचे स्टीकर्स काढून ते सर्व आस्थापनांत लावावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार ही योजना सक्षमपणे राबविली जाणार असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले.

विभागवार करणार प्रबोधन

या योजनेचे अनावरण आयुक्त कलशेट्टी यांच्या हस्ते दुकानांत स्टीकर चिकटवून शुक्रवारी करण्यात आले. सर्व संघटनांमार्फत तसेच विभागवार समित्या करून त्यांच्यामार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील आस्थापनांत स्टीकर्स चिकटवून व्यापारी, ग्राहक यांचे प्रबोधन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, खजिनदार हरिभाई पटेल, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, आदी उपस्थित होते.
 

Web Title: My family, my responsibility plan Kolhapur Chamber will implement competently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.