मुश्रीफ फौंडेशनतर्फे ४०० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 06:16 PM2021-07-28T18:16:29+5:302021-07-28T18:17:03+5:30

Kolhapur Flood Hasan Musrif Kolhapur : हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे गडहिंग्लज शहरासह गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापूर येथील सुमारे ४०० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Mushrif Foundation distributes essential items to 400 flood victims | मुश्रीफ फौंडेशनतर्फे ४०० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गडहिंग्लज येथील पूरग्रस्तांना नविद मुश्रीफ यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी गुंड्या पाटील, वसंत यमगेकर, आप्पा कोळी, शुभदा पाटील, अजितसिंह किल्लेदार, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.

googlenewsNext

गडहिंग्लज : हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे गडहिंग्लज शहरासह गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापूर येथील सुमारे ४०० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी गडहिंग्लज शहर व गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नविद मुश्रीफ म्हणाले, अलिकडे वारंवार येणाऱ्या महापुरामुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. शेवटच्या पूरग्रस्ताला मदत मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे शहराध्यक्ष गुंड्या पाटील, माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर, नगरसेविका शुभदा पाटील, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, आण्णासाहेब देवगोंडा, शिवराज पाटील, राजू जमादार, संतोष कांबळे, अमर मांगले, पूनम म्हेत्री, तलाठी अजितसिंह किल्लेदार, मंडल अधिकारी आप्पासाहेब कोळी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Mushrif Foundation distributes essential items to 400 flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.