नगरपालिकेची यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:26 AM2021-07-29T04:26:13+5:302021-07-29T04:26:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीचे पाणी अतिशय संथगतीने ओसरू लागले आहे. अनेक दिवस घर, दुकान व ...

The municipal system started working | नगरपालिकेची यंत्रणा लागली कामाला

नगरपालिकेची यंत्रणा लागली कामाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीचे पाणी अतिशय संथगतीने ओसरू लागले आहे. अनेक दिवस घर, दुकान व कारखान्यांमध्ये पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, चिखल साचला आहे. जस-जसे पाणी कमी होईल, तसे स्थलांतरित नागरिक स्वच्छता व साफसफाईसाठी परतू लागले आहेत. पालिकेकडूनही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या महापूर पाण्याची पातळी ७४ फुटांवर आहे.

शहरातील प्रभाग क्र १, २, ३, ९ व १३ या भागास पुराचा मोठा फटका बसला आहे. या ठिकाणांना चार दिवसांपासून पाण्याने वेढा दिला आहे. यामुळे जवळपास वीस हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच पाचशेहून अधिक जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. सध्या अनेक भागातील पाणी ओसरू लागले आहे. महापुरामुळे अनेक यंत्रमाग कारखाने पाण्याखाली गेले होते. या ठिकाणीही पाणी कमी झाल्याने यंत्रमागधारक कारखान्याची स्वच्छता करत आहेत.

चौकट 'आयजीएम' मध्ये इतर रुग्णांवर उपचार

पूरग्रस्त भागातील स्वच्छता सुरू असली तरी काही साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने आयजीएम रुग्णालयातील कोविड विभागासह अन्य रुग्णांना तपासणीसाठी परवानगी द्यावी, याबबात आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली. तेथे लवकरच इतर रुग्णांवरही उपचार सुरू होतील, असे आवाडे यांनी सांगितले.

Web Title: The municipal system started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.