महावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी : कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:18 AM2020-01-21T11:18:33+5:302020-01-21T11:20:10+5:30

महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.

Municipal Corporation should withdraw proposed hike: a statement to executive engineers | महावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी : कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

महावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन सोमवारी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना सादर केले. यावेळी किशोर घाटगे, सुनील देसाई, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार, दिलीप देसाई, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमहावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी : कार्यकारी अभियंत्यांना निवेदनसर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीची मागणी

कोल्हापूर : महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र  राज्य विद्युत वितरण कंपनीने आगामी पाच वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार पुढील पाच वर्षांसाठी या कंपनीने ६० हजार कोटी रुपयांची वाढ मागितलेली आहे.

गेल्या तीन वर्षांतील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी व पुढील पाच वर्षांतील योजनांसाठी हा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव ६०,३१३ कोटी १९ लाख रुपयांचा असला तरी प्रत्येकवर्षी दरवाढ मागितली आहे. म्हणजे २०२०-२१ साठी ५.८ टक्केदरवाढ, २०२१-२२ साठी ३.२५ टक्के, २०२२-२३ साठी २.९३ टक्के, २०२३-२४ करिता २.६१ टक्केआणि २०२४-२५ साठी २.५४ टक्के, अशी वाढ मागितलेली आहे.

यासोबतच स्थिर आकारामध्येही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना पूर्वी ९ रुपये ठोक रक्कम स्थिर आकार म्हणून घेतला जात होता. तो नवीन प्रस्तावानुसार वीज वापरानुसार होणार असून, शून्य ते १०० युनिटला १०० रुपये, १०१ ते ३०० युनिटला ११० रुपये, ३०१ ते ५०० युनिटला ११० रुपये व ५०० युनिटच्यापुढे १२० रुपये आकारण्यात येणार आहेत. घरगुती वापरासाठी वापरलेल्या शून्य ते १०० युनिट वीज ग्राहकांना ३.०५ पैसे प्रतियुनिट दर होता. तो प्रस्तावामध्ये ३.३० इतका मागितला आहे.

दिल्लीसारख्या लहान राज्यात गरीब ग्राहकांसाठी वीजदराचा पहिला स्लॅब शून्य ते २०० युनिट असून, त्याचा दर ३ रुपये प्रतियुनिट आहे. तर महाराष्ट्रत याच युनिटचे दर ३ रुपये ५ पैसे आहे. म्हणजेच ते दर दिल्लीच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे राज्यातही असेच दर आकारावेत. २०१७-१८ ते २०१९-२० या कालावधीत ८७४० कोटी रुपये तूट कशी आली, हे जाहीर करावे.
शिष्टमंडळात निमंत्रक आर. के. पोवार, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, किशोर घाटगे, अजित सासने, दिलीप देसाई, अशोक भंडारे, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Municipal Corporation should withdraw proposed hike: a statement to executive engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.