स्थायी समिती सभापती निवडीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:25 PM2020-08-12T12:25:38+5:302020-08-12T12:26:43+5:30

रिक्त झालेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक तारीख निश्चित करून मिळावी, असे पत्र महापालिकेचे नगरसचिव सुनील बिद्रे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवले आहे.

Movements started by the administration for the election of the Standing Committee Chairman | स्थायी समिती सभापती निवडीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू

स्थायी समिती सभापती निवडीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू

Next
ठळक मुद्देस्थायी समिती सभापती निवडीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरूपुणे विभागीय आयुक्तांकडे निवडीसाठी तारीख निश्चित करण्याची मागणी

कोल्हापूर : रिक्त झालेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक तारीख निश्चित करून मिळावी, असे पत्र महापालिकेचे नगरसचिव सुनील बिद्रे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवले आहे.

महापालिकेच्या संदीप कवाळे यांनी स्थायी समिती सभापती पदाचा सोमवारी (दि. १०) राजीनामा दिला. यानंतर महापालिका प्रशासनाकडून रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रिक्त झालेल्या जागेसंदर्भात मंगळवारी नगरसचिव सुनील बिद्रे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांना पत्र पाठवले.

यामध्ये नवीन सभापती नियुक्ती करण्यासाठी निवडणुकीची तारीख आणि अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती व्हावी, असे यामध्ये म्हटले आहे. स्थायी समिती सभापतीसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर शिक्षण समिती सभापती प्रभाग समिती सभापती आणि महापौर निवडीसाठी हालचाली सुरू होणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर या पदासाठीच्या राजकीय हालचालींना सुरुवात होणार आहे. विरोधी भाजप ताराराणी आघाडीकडून अद्यापि हालचाली सुरू नाहीत. राष्ट्रवादीकडून निवडीच्या आदल्या दिवशी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

Web Title: Movements started by the administration for the election of the Standing Committee Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.