Mokka denied bail to three | मोक्कातील तिघांचा जामीन नामंजूर

मोक्कातील तिघांचा जामीन नामंजूर

इचलकरंजी : मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या तसेच सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या अनिल ऊर्फ आप्पा गँगमधील तिघा संशयित आरोपींचा जामीन मोक्का न्यायालयाने नामंजूर केला. पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी सादर केलेले गुन्ह्यातील गांभीर्य व सरकारी वकिलांनी मांडलेले म्हणणे यावरून मोक्का न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

टोळीप्रमुख अनिल संपत मोळे (वय ३३), अजित अशोक माळी (३०, दोघे रा. तारदाळ, ता. हातकणंगले) व मिंटू उपेंद्र रॉय (३०, रा. शहापूर) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी जामीन मंजूर होण्यासाठी मोक्का न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळल्याने त्यांना पुन्हा कारागृहातच राहावे लागणार आहे. तसेच या रद्दच्या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून मोक्कातील जामीन मिळण्याच्या साखळीलाही चाप बसला आहे.

Web Title: Mokka denied bail to three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.