शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धती गंभीर रुग्णालाही लाभदायी : विजयकुमार माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:46 IST

अलीकडे कॅन्सर, हृदयविकार, किडनी व लिव्हर खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मॉडर्न होमिओपॅथी किडनी अ‍ॅड कॅन्सर केअर सेंटर, रिसर्च अ‍ॅड ट्रिटमेंट सेंटरचे सीईओ डॉ. विजयकुमार माने यांच्याशी साधलेला थेट संवाद...

ठळक मुद्देकॅन्सर, हृदयविकार, किडनी व लिव्हर आजारांवर होमिओपॅथी जीवनदायी

अलीकडे कॅन्सर, हृदयविकार, किडनी व लिव्हर खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. मुळातच या आजारांची लागण झाल्यानंतर ते लवकर लक्षात येत नाहीत, त्यामुळे रोग वाढत जातो. त्यावर वेळेत व योग्य उपचार केल्यास या सर्व दुर्धंर आजारांवर मात करता येणे सहज शक्य आहे. यासाठी आता होमिओपॅथी उपचारपद्धतीही दिलासादायक ठरली आहे. त्यासाठी अ‍ॅलोपॅथी औषधाला होमिओपॅथीची पूर्णपणे समांतर व्यवस्था उभी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मॉडर्न होमिओपॅथी किडनी अ‍ॅड कॅन्सर केअर सेंटर, रिसर्च अ‍ॅड ट्रिटमेंट सेंटरचे सीईओ डॉ. विजयकुमार माने यांच्याशी साधलेला थेट संवाद...प्रश्न : होमिओपॅथी उपचारपद्धती म्हणजे काय व ती किती लागू पडते.उत्तर : वेदनाशामक औषधे वारंवार घेतल्यामुळे त्याचा परिणाम किडनी आणि लिव्हरवर होतो. परिणामी हे दोन्हीही भाग खराब होते. त्यानंतर अ‍ॅलोपॅथीच्या तत्त्वानुसार किडनी ट्रान्स्फर हाच उपाय राहतो; पण हे ट्रान्स्फर न करताही आजार बरा होऊ शकतो तोही मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धतीनुसार होय; पण त्यासाठी रुग्णाला उपचारानंतर परिणाम जाणून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. लोकांना आणि डॉक्टरांनाही आम्ही दिलासा दिलेला आहे की होमिओपॅथी औषधाने हे रोग बरे होऊ शकतात. त्यासाठी उपचारापूर्वीची अवस्था, उपचारदरम्यान व उपचारानंतरची अवस्था म्हणजे रुग्णाला आजारातून बरे करण्याचे आम्ही प्रमाणपत्रच देतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.प्रश्न : होमिओपॅथी उपचारपद्धती अद्याप का रुजली नाही?उत्तर : होमिओपॅथी उपचारपद्धती करणारे डॉक्टर हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच आहेत. होमिओपॅथी हे एक सायन्स आहे. प्रामाणिकपणे काम करीत राहिल्यास आज होमिओपॅथी डॉक्टरांना सुगीचे दिवस आहेत. होमिओपॅथी उपचारपद्धतीबाबत आज समाजात प्रबोधन जागृती करण्याची गरज आहे; पण होमिओपॅथी उपचारपद्धतीमध्ये रुग्णाला गंभीर आजारातून पूर्णपणे बरा करू शकण्याची ताकद आहे; पण त्यासाठी रुग्णाची मानसिकता आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांनी रुग्णांना होमिओपॅथी उपचारपद्धतीकडे पाठविणे आवश्यक आहे.प्रश्न : मॉडर्न होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीत फरक काय?उत्तर : समजा एखाद्या रुग्णाची किडनी खराब झाली असेल तर ती ट्रान्सफर करण्यासाठी ३५ ते ५० लाख रुपये खर्च येतो तसेच शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दरमहा किमान ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर किडनी ट्रान्स्फर केल्यानंतर त्याचे आयुष्य किती हे तो संबंधित डॉक्टर सांगू शकत नाही; पण त्यासाठी मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धती अवलंबल्यास अ‍ॅलोपॅथीच्या एकूण खर्चाच्या फक्त १० टक्के खर्च येतो. कोणतीही चिरफाड नाही अगर सुई अंगाला लावण्याचा विषयच येत नाही, आहे तिच किडनी मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धतीनुसार पूर्णपणे चांगली होण्यास मदत करते. त्यासाठी औषधे तोंडावाटे घ्यावी लागतात. हा आमच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधांचा चमत्कार म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजपर्यंत राज्यातील मुंबईसह अनेक मोठ्या व नामवंत रुग्णालयांत अखेरच्या क्षणाशी झुंजणाऱ्या रुग्णांचा मी जीव मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धतीनुसार वाचविला आहे. अनेक रुग्णही अ‍ॅलोपॅथी औषधे घेऊन बरे न झाल्यास अखेरच्या क्षणीही आमच्याकडे येतात. त्यांनाही मॉडर्न होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीने मी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले आहे. त्यानंतर काही महिन्यांतच रुग्ण पूर्णपणे बरा होतो. त्यासाठी खर्चही नाममात्र आहे. सर्व मॉडर्न होमिओपॅथीची सर्व औषधे तोंडावाटे घेऊनही त्याचा गुणही वेगवान येतो.प्रश्न : कॅन्सरवरही मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धती फायदेशीर कशी?उत्तर : कॅन्सर या आजाराचे निदान प्राथमिक अवस्थेत असताना झाल्यास त्यावर उपचार करणे एकदम सोपे जाते. स्क्रीनिंग पद्धतीद्वारे कॅन्सरसारख्या आजाराचे उच्चाटन करणे सहज शक्य आहे. होमिओपॅथी उपचारपद्धतीने कॅन्सरचा रुग्ण वेदनामुक्त जीवन जगू शकतो. त्याच्या प्रतिकारशक्तीमध्येही चांगल्या प्रकारे वाढ होते. होमिओपॅथी औषधे खोलवर जाऊन वेदना कमी करतात. त्यासाठी मॉडर्नची होमिओपॅथी उपचारपद्धती ही वेगवेगळ्या टप्प्यांवर करावी लागते. पहिल्या टप्प्यात रुग्णाची लाईफ क्वॉलिटी प्रथम सामान्य केली जाते. दुसºया टप्प्यात आजाराला उपचारांची दिशा दिली जाते. पेन मॅनेजमेंटद्वारे कॅन्सरच्या गाठीची वाढ रोखली जाते. मॉडर्न होमिओपॅथीमुळे हे कर्करोगाच्या गाठी व वेदनाही कमी होतात. या औषधोपचार पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. रुग्णांचे रिपोर्ट पाहून त्या आधारावर त्याच्यावर मॉडर्न उपचारपद्धती केली जाते. मॉडर्न उपचारपद्धतीमुळे अनेक रुग्णांना दिलासा व नवजीवन मिळाले आहे. रक्तातील कॅन्सर (अ‍ॅक्युक्लिकेमिया) हा एक नव्याने डोके वर काढलेला गंभीर आजार आहे. यासाठी मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धती घेतल्यास पुढील तीन महिन्यांत रुग्णाचा अहवाल पूर्णपणे सामान्य येतो.प्रश्न : मॉडर्न होमिओपॅथीच्या शाखा कुठे आहेत?उत्तर : मॉडर्न होमिओपॅथी उपचारपद्धतीच्या कोल्हापूरसह मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, ठाणे, सोलापूर तसेच गोवा राज्यांत मडगाव आणि म्हापसा येथे शाखा कार्यरत आहेत. याशिवाय कर्नाटक आणि गुजरात येथेही लवकरच शाखा सुरू करीत आहे. ‘मॉडर्न’चे रिसर्च सेंटर हे कोल्हापुरात शिरोली औद्योगिक वसाहतीत उजळाईवाडी येथे आहे.- तानाजी पोवार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीय