CoronaVirus: आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:33 PM2020-04-03T19:33:19+5:302020-04-03T19:34:19+5:30

पश्चिम महाराष्ट्रामध्ये संशयीत कोरोना बाधीतांच्या स्वॅब चाचणीची लॅब मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या लॅबला भेट देऊन या अद्यावत लॅबची पहाणी केली.

Minister of State for Health Yadravkar visits Miraj and Ichalkaranji Government Hospitals | CoronaVirus: आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेट

CoronaVirus: आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेट

Next
ठळक मुद्देआरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेटअद्यावत लॅबची केली पहाणी

कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्रामध्ये संशयीत कोरोना बाधीतांच्या स्वॅब चाचणीची लॅब मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या लॅबला भेट देऊन या अद्यावत लॅबची पहाणी केली.

ही लॅब कांही दिवसात सुरु करीत असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री.यड्रावकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. या लॅबमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील कोरोना संशयीतांच्या चाचण्या वेगाने होण्यास मदत होणार आहे. राज्यमंत्री यड्रावकर यांनी मिरज भेटी दरम्यान कोरोना बाधीत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची व त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराबाबतची सविस्तर माहिती आरोग्य अधिकरी व उपस्थित डॉक्टर्स यांच्याकडून घेतली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. नणंदकर, डॉ. दीक्षित, डॉ.रुपेश शिंदे व इतर डॉक्टर्स व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राज्यमंत्री यड्रावकर यांनी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयास भेट देऊन तेथे क्वारंटाईन केलेल्या रुग्णांबाबतची माहिती घेतली. डॉक्टर्स व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी मदन कारंडे, शहरप्रमुख महादेव गौड यांच्यासह रुग्णालयाचे प्रमुख डॉ.शेटे, यांच्यासह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Minister of State for Health Yadravkar visits Miraj and Ichalkaranji Government Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.