विविध उपक्रमांनी जागविल्या हेलन केलर यांच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:30 PM2020-06-27T17:30:53+5:302020-06-27T17:52:39+5:30

डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेमार्फत जिल्ह्यात शनिवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संस्थेच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने हेलन केलर यांची माहिती सांगून केलर यांच्या आठवणी जागविल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Memories of Helen Keller awakened by various activities | विविध उपक्रमांनी जागविल्या हेलन केलर यांच्या स्मृती

कोल्हापूरातील विकास विद्यामंदिर येथे हेलन केलर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विनोद पालेशा, कल्पना आवळे, अस्लम शिकलगार, अजय वणकुद्रे उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसक्षमच्या उपक्रमाला प्रतिसाद दिव्यांग बांधवांकडून फेसबुकच्या माध्यमातून माहितीचे प्रसारण

कोल्हापूर : डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेमार्फत जिल्ह्यात शनिवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संस्थेच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने हेलन केलर यांची माहिती सांगून केलर यांच्या आठवणी जागविल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.

गेली १५ वर्षे कोल्हापूरात दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या सक्षम या संस्थेच्या फेसबुक पेजवरुन अंध, अस्थिव्यंग, कर्णबधीर, मूकबधिर दिव्यांग बांधवांनी हेलन केलर यांची माहिती सांगणारे व्हिडिओ प्रसारित केले.

विकास विद्यामंदिर येथेही हेलन केलर जयंतीनिमित्त हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका कल्पना आवळे, अस्लम शिकलगार, सक्षम संस्थेचे विनोद पालेशा, विशेष शिक्षक अजय वणकुद्रे उपस्थित होते.

 

Web Title: Memories of Helen Keller awakened by various activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.