'या' मराठी अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते केले हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:37 AM2020-09-02T11:37:17+5:302020-09-02T11:54:37+5:30

मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या राजकीय कॉमेडी मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते अज्ञाताने हॅक करून छेडछाड केल्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार लक्षात येताच संबंधित अभिनेत्रीने कोल्हापुरात सायबर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज केला. हॅकर्सचा पोलीस कसून शोध घेत आहेत. मालिकेचे पन्हाळा तालुक्यात चित्रीकरण सुरू आहे.

Marathi channel's main actress's Instagram account hacked | 'या' मराठी अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते केले हॅक

'या' मराठी अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते केले हॅक

Next
ठळक मुद्देमराठी वाहिनीवरील मुख्य अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते केले हॅक सायबर पोलिसांकडे अज्ञाताविरुद्ध तक्रार : कोडोेलीत चित्रीकरण सुरू

कोल्हापूर : मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या राजकीय कॉमेडी मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीचे इंस्टाग्राम खाते अज्ञाताने हॅक करून छेडछाड केल्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार लक्षात येताच संबंधित अभिनेत्रीने कोल्हापुरात सायबर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज केला. हॅकर्सचा पोलीस कसून शोध घेत आहेत. मालिकेचे पन्हाळा तालुक्यात चित्रीकरण सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावच्या परिसरात मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिकेत राजकीय हीरोच्या मिसेसची प्रमुख भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रीचे इंस्टाग्राम अकाऊट अज्ञाताने हॅक केले. हा प्रकार त्या अभिनेत्रीच्या लक्षात आल्यानंतर तिने सोमवारी दुपारी कोडोली पोलीस ठाणे गाठून तेथे रीतसर तक्रार अर्ज दिला. कोडोली पोलिसांनी हा अर्ज सायंकाळी सायबर पोलीस ठाण्याकडे पाठवला असून, सायबरकडून तपास सुरू झाला आहे.

एफबीवर टाकली पोस्ट

अभिनेत्रीने स्वतः एफबीवर एक पोस्ट टाकली. सध्या इन्स्टाग्रामचे खाते माझ्या ताब्यात नसल्याचे ही त्यांनी स्वतः जाहीर केले. पन्हाळ्यावर चित्रीकरण करताना अभिनेत्रीला ई-मेल आला. त्यानुसार तिचे इन्स्टाग्राम खाते अपडेट करण्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार ती माहिती अपटेड करत होत्या.

व्हॉटस्‌ ॲप आणि फेसबुकवरसुद्धा माहिती पुढे आली. त्यामुळे तिने या अकौंटचा पासवर्डही दिला. त्यानंतर हॅकरने, तुमचे इन्स्टाग्राम खाते हॅक केल्याचे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फेसबुकसुद्धा हॅक झाले आहे. सध्या इन्स्टाग्रामचे खाते माझ्या ताब्यात नसल्याने दुसरे खाते काढल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

Web Title: Marathi channel's main actress's Instagram account hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.