ठोस निर्णय घ्या, तोपर्यंत लॉकडाऊनमधील वीज बिल भरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:52 PM2020-10-20T18:52:29+5:302020-10-20T18:53:38+5:30

mahavitaran, kolhapurnews लॉकडाऊन कालावधीतील घरगुती वीज बिले माफ करण्याबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा, तोपर्यंत ग्राहक वीज बिले भरणार नाहीत, असा स्पष्ट इशारा कृती समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. निर्णय न घेतल्यास दि. २७ ऑक्टोबरला राज्यव्यापी टाळे ठोक आंदोलन करण्याचाही कृती समितीने निर्णय घेतला.

Make a firm decision, until the electricity bill in the lockdown is paid | ठोस निर्णय घ्या, तोपर्यंत लॉकडाऊनमधील वीज बिल भरणार नाही

ठोस निर्णय घ्या, तोपर्यंत लॉकडाऊनमधील वीज बिल भरणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देठोस निर्णय घ्या, तोपर्यंत लॉकडाऊनमधील वीज बिल भरणार नाहीसर्वपक्षीय कृती समितीचा निर्णय : २७ ऑक्टोबरला टाळे ठोक राज्यव्यापी आंदोलन

 कोल्हापूर: लॉकडाऊन कालावधीतील घरगुती वीज बिले माफ करण्याबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा, तोपर्यंत ग्राहक वीज बिले भरणार नाहीत, असा स्पष्ट इशारा कृती समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. निर्णय न घेतल्यास दि. २७ ऑक्टोबरला राज्यव्यापी टाळे ठोक आंदोलन करण्याचाही कृती समितीने निर्णय घेतला.

राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांच्या सूचनेनुसार प्रताप होगाडे, आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयात मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांच्याशी चर्चा करुन मागण्यांचे निवेदन दिले.

लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले माफ करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने शिष्टमंडळाने अभियंता निर्मळे यांना धारेवर धरले. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी, ग्राहकांच्या वीज बिलाबाबत राज्य सरकार संवेदशील असल्याचे सांगून, तीन महिने आंदोलन सुरू आहे तरीही शासन दखल घेत नसल्याने खंत व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व कृती समितीचे सहनिमंत्रक बाबा पार्टे यांनीही, लॉकडाऊन कालावधीतील सहा महिन्यांच्या वीज बिलाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास दि. २७ चे टाळे ठोक आंदोलन एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संयमाने होईल; पण त्यानंतर उद्रेक झाल्यास त्याला राज्य सरकार व महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा दिला. वीज बिलाबाबत सवलत देण्यास ऊर्जामंत्री सकारात्मक असल्याचे अभियंता निर्मळे यांनी सांगितले.

आंदोलनात आर. के. पोवार, प्रताप होगाडे, बाबा पार्टे, चंद्रकांत पाटील, विक्रांत पाटील, आर. के. पाटील, बाबासाहेब देवकर, मारुती पाटील, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुभाषण जाधव, किशोर घाटगे, आदी सहभागी झाले होते.

 

Web Title: Make a firm decision, until the electricity bill in the lockdown is paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.