Maharashtra Vidhan Sabha 2019: निवडणूक रिंगणातून बाजूला जाणाऱ्या ‘संध्यादेवी’ पहिल्या आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:51 AM2019-09-21T11:51:42+5:302019-09-21T11:55:20+5:30

विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षांतराबरोबरच राजकीय साठमारी जोरात सुरू असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. रिंगणातून स्वताहून बाजूला जाणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत.

 Maharashtra Vidhan Sabha 2019: 'Sandhidevi' first MLA to step out of polls | Maharashtra Vidhan Sabha 2019: निवडणूक रिंगणातून बाजूला जाणाऱ्या ‘संध्यादेवी’ पहिल्या आमदार

Maharashtra Vidhan Sabha 2019: निवडणूक रिंगणातून बाजूला जाणाऱ्या ‘संध्यादेवी’ पहिल्या आमदार

googlenewsNext
ठळक मुद्देरिंगणातून बाजूला जाणाऱ्या ‘संध्यादेवी’ पहिल्या आमदार‘गणपतरावांपाठोपाठ कुपेकरांचा निर्णय

राजाराम लोंंढे

कोल्हापूर : विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षांतराबरोबरच राजकीय साठमारी जोरात सुरू असताना चंदगडविधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. रिंगणातून स्वताहून बाजूला जाणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत.

वयोमानामुळे आपण विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय आमदार कुपेकर यांनी घेतला असला तरी ‘ईव्हीएच’ आंदोलनात आक्रमक भूमिका घेत कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांनी युवक क्रांती आघाडी करून चंदगड मध्ये त्यांनी पुढील राजकारणाची बिजे रोवली.

जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात त्या भाजपच्या बाजूनेच उभ्या राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. त्यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. पण ‘चंदगड’ मतदारसंघात युतीत शिवसेनेकडे असल्याने त्यांची गोची झाली.

तरीही युती तुटली तर भाजपची उमेदवारी घ्यायची त्यामुळे गेली दीड-दोन महिने त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली. मात्र भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला, त्यात तळ्यात मळ्यात भूमिकेने राष्ट्रवादीमध्येही त्यांच्या विश्वासर्तसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने गुरूवारी निवडणूक रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला. रविवारी (दि. २२) कार्यकर्त्यांचा त्यांनी मेळावा आयोजित केल्याने त्या पुन्हा ‘यू’ टर्न घेणार का? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.

‘गणपतरावांपाठोपाठ कुपेकरांचा निर्णय

‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी आपण निवडणूकीला उभे न राहण्याचा निर्णय कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला. पण कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोध करत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्यानंतर आमदार कुपेकर यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

 

Web Title:  Maharashtra Vidhan Sabha 2019: 'Sandhidevi' first MLA to step out of polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.