Maharashtra Vidhan Sabha 2019 :  डी. वाय. पाटील यांच्या नातवाकडे तब्बल ३४ कोटीची  संपत्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 05:50 PM2019-10-03T17:50:14+5:302019-10-03T17:51:14+5:30

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे विद्ममान आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत. अवघ्या २९ वर्षांच्या पाटील यांची संपत्ती तब्बल ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019: d. Y Patil's grandson owns a fortune worth Rs 3 crore | Maharashtra Vidhan Sabha 2019 :  डी. वाय. पाटील यांच्या नातवाकडे तब्बल ३४ कोटीची  संपत्ती 

Maharashtra Vidhan Sabha 2019 :  डी. वाय. पाटील यांच्या नातवाकडे तब्बल ३४ कोटीची  संपत्ती 

googlenewsNext
ठळक मुद्दे डी. वाय. पाटील यांच्या नातवाकडे तब्बल ३४ कोटीची संपत्ती कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भरला अर्ज

कोल्हापूर : माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणविधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे विद्ममान आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत. अवघ्या २९ वर्षांच्या पाटील यांची संपत्ती तब्बल ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

ऋतुराज पाटील यांनी आज, गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. ऋतुराज विवाहित आहेत. त्यांच्याकडे ४ लाख १ हजार ३२0 रुपयांंची दुकाटी बाईक आहे. त्यांच्याकडील पोर्शे कारची किंमत तब्बल २ कोटी ६२ लाख ३३ हजार २५७ इतकी तर फोर्डची किंमत २७ लाख रुपये आहे. ऋतुराज यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. जमीन जुमला, ठेवी, गाड्या, दागदागिने अशी कोट्यवधीची संपत्ती ऋतुराज पाटील यांच्या नावे आहे.
ऋतुराज यांच्याकडे असलेल्या सुझुकी बाईकची किंमत ५५ हजार ७८७ इतकी आहे.

याशिवाय ४ लाख ६५ हजार १३१ रुपयांचे सोन्याचे दागिने, ४ लाख ६0 हजार ६३५ रुपयांचे हिरे, शेतजमीन, घर, बंगला मिळून एकुण ११ कोटी ४७ लाख ७ हजार २९७ रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय हॉटेल सयाजीची ११ लाख ६४ हजार ८४0, डी वाय पी हॉस्पिटलची ४२ लाख ७२ हजार, गजानन अग्रो फार्मरचे १३ कोटी ९५ लाख २७ हजार ९९९, भाऊ पृथ्वीराज पाटील यांना दिलेले १ कोटी ७२ लाख ६0 हजार इतकी संपत्ती आहे. याशिवाय ठेवी, रोख रक्कम, शेअर्सच्या माध्यमातून २२ कोटी ८८ लाख ५८ हजार १४0, अशी मिळून एकूण ३४ कोटी ३५ लाख ६५ हजार ४३७ रुपयांची संपत्ती ऋतुराज पाटील यांच्याकडे असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: d. Y Patil's grandson owns a fortune worth Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.