शिवाजी विद्यापीठाची एम. फिल., पीएच. डी. प्रवेश परीक्षा बुधवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:26 PM2019-09-16T12:26:32+5:302019-09-16T12:28:01+5:30

शिवाजी विद्यापीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. २०) परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे.

M. of Shivaji University. Phil., Ph. D. Entrance Exam Wednesday | शिवाजी विद्यापीठाची एम. फिल., पीएच. डी. प्रवेश परीक्षा बुधवारपासून

शिवाजी विद्यापीठाची एम. फिल., पीएच. डी. प्रवेश परीक्षा बुधवारपासून

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाची एम. फिल., पीएच. डी. प्रवेश परीक्षा बुधवारपासून४२ अभ्यासक्रमांचा समावेश; आॅफलाईन स्वरूप

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. २०) परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे.

बिझनेस मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मराठी, संख्याशास्त्र, होमसायन्स, सोशॉलॉजी, फिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, हिंदी, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, वनस्पतीशास्त्र, राज्यशास्त्र, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सिव्हील इंजिनिअरिंग, रसायनशास्त्र, इतिहास, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पर्यावरणशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, आदी ४२ विषयांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत (कोल्हापूर), कन्या महाविद्यालय (सांगली), यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅॅफ सायन्स (सातारा) या ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. सकाळी १0 ते दुपारी १२, दुपारी १ ते ३ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत परीक्षा होणार आहेत.

या परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपातील प्रश्न असणार आहेत. परीक्षार्थींनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. एस. पळसे यांनी केले आहे.
 

 

Web Title: M. of Shivaji University. Phil., Ph. D. Entrance Exam Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.