आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत कर्ज-दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:02 PM2020-03-05T19:02:32+5:302020-03-05T19:04:43+5:30

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती वरणगे (ता. करवीर) येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Loan Deepak Mhaskar within two days after Aadhaar authentication | आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत कर्ज-दीपक म्हैसेकर

वरणगे (ता. करवीर) येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण नोंद पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अर्पणा पाटील उपस्थित होत्या.

googlenewsNext
ठळक मुद्देआधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत कर्ज-दीपक म्हैसेकर वरणगे येथे प्रमाणीकरण प्रक्रियेची पाहणी

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती वरणगे (ता. करवीर) येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

करवीर तालुक्यातील वरणगे येथील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, गट विकास अधिकारी सचिन घाडगे, वरणगेच्या सरपंच अर्पणा पाटील उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावतीचे वितरणही करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या योजनेंतर्गत जिल्ह्यात ४२ हजार ९१३ थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३८ हजार २०० थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून त्यांना कर्जमुक्त करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. आजवर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे १०९ कोटी रुपये जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी म्हैसेकर यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम गतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तत्काळ करावे, अशी सूचना संबंधित विभागाला दिली. यावेळी त्यांच्या हस्ते निवृत्ती पाटील, शिवाजी तिबिले, पांडुरंग पाटील, दगडू तिबिले, शालिनी पाटील, अनिल पाटील या थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण नोंद पावतीचे वितरण करण्यात आले.

 

 

Web Title: Loan Deepak Mhaskar within two days after Aadhaar authentication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.