वीज बिल माफीमध्ये तोडगा काढू : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 04:24 PM2021-01-29T16:24:43+5:302021-01-29T16:26:01+5:30

mahavitaran Kolhapur Raju shetti sharad pawar- लॉकडाऊनमुळे ६ ते ७ महिन्यांच्या काळात रोजीरोटीच बंद असल्याने सर्वांचीच दमछाक झाली आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीपंपाची वीजबील माफी करण्यासंदर्भात सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्याकडे केली.

Let's find a solution in electricity bill waiver: Sharad Pawar | वीज बिल माफीमध्ये तोडगा काढू : शरद पवार

वीज बिल माफीमध्ये तोडगा काढू : शरद पवार

Next
ठळक मुद्देवीज बिल माफीमध्ये तोडगा काढू : शरद पवारराजू शेट्टी यांचे वीजबिल माफीची मागणी

जयसिंगपूर : लॉकडाऊनमुळे ६ ते ७ महिन्यांच्या काळात रोजीरोटीच बंद असल्याने सर्वांचीच दमछाक झाली आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीपंपाची वीजबील माफी करण्यासंदर्भात सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्याकडे केली.

लॉकडाऊनच्या काळातील घरगुती व शेतीपंपाचे वीज बील माफीमध्ये योग्य तोडगा काढू, असे आश्वासन खासदार पवार यांनी यावेळी दिले. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे , महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे बाबासो पाटील भुयेकर , विक्रम पाटील किणीकर , रावसाहेब तांबे , शैलेश चौगुले यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Let's find a solution in electricity bill waiver: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.