कोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 06:09 PM2020-08-08T18:09:19+5:302020-08-08T18:11:36+5:30

गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा रानभाज्यांचा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरोघरीच साजरा होणार आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यात सर्वत्र  ९ आॅगस्ट हा दिवस रानभाज्या महोत्सव म्हणून साजरा करत आहे.

Kolhapurkar will hold a vegetable festival at home | कोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सव

कोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सव

Next
ठळक मुद्देकोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सवनिसर्ग मित्रचा पुढाकार : राज्य सरकार साजरा करणार उपक्रम

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा रानभाज्यांचा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरोघरीच साजरा होणार आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यात सर्वत्र  ९ आॅगस्ट हा दिवस रानभाज्या महोत्सव म्हणून साजरा करत आहे.

गेली १० वर्षे कोल्हापूरातील निसर्गमित्र परिवाराच्या वतीने रानभाज्या ओळख व संवर्धनाचे काम सातत्याने सुरु आहे. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सर्वांना कळावेत, त्यांची ओळख व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्यांचा महोत्सव घेण्यात येतो.

परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा उपक्रम निसर्गप्रेमी नागरिकांनी स्वगृही राहून स्वत:च्या कुटुंबासमवेत साजरा करणार आहेत. निसर्ग मित्र परिवारातर्फे अंगणात, परसात नुकत्याच उगवलेल्या रानभाज्या बनवून त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

आपल्या परिसरात सहज मिळणाऱ्या रानभाज्या

शेवगा, केणा, आघाडा, अंबुशी, गुळवेल, आळु, ओवा, गोकर्ण, कुर्डू, उंबर,मायाळ, कांडवेल


सर्वांनी या वर्षी रानभाज्यांचा महोत्सव घरी साजरा करुया. रानभाज्या खाऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून निरोगी राहू या.
- अनिल चौगुले,
कार्यवाह, अनिल चौगुले, निसर्गमित्र परिवार, कोल्हापूर.

Web Title: Kolhapurkar will hold a vegetable festival at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.