लंडन शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी कोल्हापूरच्या लघुपटाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 02:29 PM2020-06-10T14:29:07+5:302020-06-10T14:33:27+5:30

बाललैंगिक अत्याचारावर प्रकाश टाकणाऱ्या आणि अतिशय स्फोटक विषयावर भाष्य करणाऱ्या तमस या लघुपटाची निवड प्रतिष्ठेच्या लंडन येथील शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. कोल्हापूरच्या तन्मय निनाद याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूरचे तिघेजण या लघुपटाचा भाग आहेत. दरवर्षी लंडनमध्ये होणारा हा महोत्सव यंदा २१ ते २६ जून या कालावधीत ऑनलाईन होणार आहे. फर्स्ट टाईम फिल्ममेकर सेशन्स या प्रकारात तन्मयच्या या लघुपटाची निवड झाली.

Kolhapur short film selection for London Short Film Festival | लंडन शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी कोल्हापूरच्या लघुपटाची निवड

लंडन शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी कोल्हापूरच्या लघुपटाची निवड

Next
ठळक मुद्देलंडन शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी कोल्हापूरच्या लघुपटाची निवडतन्मय निनादचे दिग्दर्शन : २१ ते २६ जूनदरम्यान ऑनलाईन प्रदर्शन

संदीप आडनाईक

कोल्हापूर : बाललैंगिक अत्याचारावर प्रकाश टाकणाऱ्या आणि अतिशय स्फोटक विषयावर भाष्य करणाऱ्या तमस या लघुपटाची निवड प्रतिष्ठेच्या लंडन येथील शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. कोल्हापूरच्या तन्मय निनाद याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूरचे तिघेजण या लघुपटाचा भाग आहेत. दरवर्षी लंडनमध्ये होणारा हा महोत्सव यंदा २१ ते २६ जून या कालावधीत ऑनलाईन होणार आहे. फर्स्ट टाईम फिल्ममेकर सेशन्स या प्रकारात तन्मयच्या या लघुपटाची निवड झाली.

तन्मय निनाद हा २१ वर्षीय तरुण कोल्हापुरातील डबिंग आर्टिस्ट निनाद काळे यांचा धाकटा चिरंजीव. वडील आणि वडीलबंधूच्या पाठोपाठ तन्मयनेही मनोरंजनाचेच क्षेत्र निवडले आहे. मात्र, डबिंग आर्टिस्टऐवजी लघुपट आणि छायाचित्रण कलेकडे त्याचा ओढा होता. पुण्यात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच नाटक, सिनेमा, लघुपट, छायाचित्रणाच्या कामाचे काम करून प्रशिक्षण घेतले. गेली चार वर्षे तो वेगवेगळ्या लघुपटांशी संबंधित आहे. देख तमाशा आणि इन्फिनिटी लॉकडाऊन हे आणखी दोन लघुपटही त्याने अलीकडेच बनविले आहेत.

लहान मुलीशी समागम केल्यानंतर आजार बरा होतो, अशा मानसिकतेतून अनेक बाललैंगिक अत्याचार होत असतात, पण ते उघड होत नाहीत. दक्षिणेकडील काही राज्यांत बालिकेवर घरच्याच व्यक्तींकडून होणाऱ्या या अत्याचारांचा अतिशय स्फोटक विषय या लघुपटातून मांडला आहे.

निनाद काळे हे गेली ३० वर्षे डबिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचा मोठा मुलगा २८ वर्षीय मोहक हाही मुंबईत डबिंग आर्टिस्ट आहे. डिस्कव्हरी चॅनेलवरील ह्यमॅन व्हर्सेस वाईल्ड शोह्णच्या मराठी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोहकने आवाज दिला होता.

कोल्हापूरच्या तीन कलावंतांचा समावेश

लॉकडाऊनपूर्वीच तयार झालेला हा लघुपट तन्मयने स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिलाच लघुपट आहे. तन्मयसोबत सायली हळदणकर आणि या लघुपटासाठी कलादिग्दर्शन करणारी श्रेयशी रासकर हे तिघेही कोल्हापूरचे आहेत. कथा आणि दिग्दर्शन तन्मय निनाद याचे असून, पटकथा आणि संकलन अनय जोशी याचे आहे. यामध्ये प्रियंका शेट्ये, सायली हळदणकर, प्रशांत थोपटे, अनय जोशी, स्वत: तन्मय आणि रोहित सिंग यांच्या भूमिका आहेत.

 

Web Title: Kolhapur short film selection for London Short Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.