कोल्हापूर : ‘समभाव ’ चित्रपट महोत्सव ६ फेब्रुवारीपासून ,‘मावा’ फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 04:44 PM2018-01-28T16:44:58+5:302018-01-28T16:52:31+5:30

‘मावा’ कलामहिर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व महिला दक्षता समिती यांच्यावतीने ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘समभाव’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात लिंगभेद व पुरुषत्वावाबतच्या चुकीच्या कल्पना, समलिंगी व्यक्ती व त्यांचे जीवन, तृतीयपंथी व त्यांचे जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलुवरील १६ माहितीपट व चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

Kolhapur: 'Sambhav' Film Festival will be held on 6th February, organized by 'Mawa' Film Society, Mahila Vigilance Committee | कोल्हापूर : ‘समभाव ’ चित्रपट महोत्सव ६ फेब्रुवारीपासून ,‘मावा’ फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे आयोजन

कोल्हापूर : ‘समभाव ’ चित्रपट महोत्सव ६ फेब्रुवारीपासून ,‘मावा’ फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘समभाव ’ चित्रपट महोत्सव ६ फेब्रुवारीपासून मावा’ फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे आयोजन

कोल्हापूर : ‘मावा’ कलामहिर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व महिला दक्षता समिती यांच्यावतीने ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘समभाव’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात स्त्री किंवा पुरुष म्हणून जगण्याची पारंपारिक चौकट मोडून जगणाऱ्या माणसांनाही सन्मानाने व सुरक्षितपणे जगता यावे. या दृष्टीने लिंगभेद व पुरुषत्वावाबतच्या चुकीच्या कल्पना, समलिंगी व्यक्ती व त्यांचे जीवन, तृतीयपंथी व त्यांचे जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलुवरील १६ माहितीपट व चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

‘मेन अगेन्स व्हायोलन्स अ‍ॅन्ड अ‍ॅब्यूज ’ ही स्त्री-पुरुष समानतेसाठी गेली २५ वर्षे कार्यरत असणारी संस्था अहे. या संस्थेने ‘फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया ’ च्या वतीने दिल्ली , बंगलोर, त्रिचूर, कोलकत्ता, जळगाव आदी ठिकाण दोन दिवसांचा ‘समभाव’ चित्रपट महोत्सव भरवला होता.

आता त्याच धर्तीवर कोल्हापूरातही ‘मावा ’ तसेच एफटीआयआयच्या साथीने व कॅनडा फंड फॉर लोकल इनिशिएटिव्हज व महिला दक्षता समिती व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने हा महोत्सव घेतला जात आहे.

यात लिंगभेद, पौरुषत्वाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, समाजात असणारी लैंगिक विविधता याबाबत यथायोग्य जाणीव निर्मिती करण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांबरोबरच महाविद्यालयीन सज्ञान विद्यार्थी-विद्यार्थीनी, सामाजिक कार्यकर्ते , तरुण सिने निर्माते या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.

याबाबत समाजात मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यानिमित्त चित्रपट व माहीतीपट पाहिल्यानंतर होणारी चर्चा हे या महोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. हा महोत्सव तीन दिवस राम गणेश गडकरी सभागृहात होणार आहे.

लघुपट व चित्रपट दाखवून त्यावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा व विचारविनमय होणार आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन सोसायटी सचिव दिलीप बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
 

 

Web Title: Kolhapur: 'Sambhav' Film Festival will be held on 6th February, organized by 'Mawa' Film Society, Mahila Vigilance Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.