कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 07:54 PM2021-04-05T19:54:14+5:302021-04-05T20:04:12+5:30

CoronaVirus Kankavli Market Sindhudurg- कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली .

Kankavali Week Market Completely Closed, Information by Sameer Nalawade | कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहिती

कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहिती

Next
ठळक मुद्देकणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहितीकोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतचा निर्णय

कणकवली : कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली .

कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी लागणारी रस्त्यावरील दुकाने त्यामुळे विक्रेत्यांना लावता येणार नाहीत . इतर दुकाने जरी सुरू असली तरी आठवडा बाजाराच्या दिवशी ज्या पद्धतीने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते ती गर्दी रोखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे . त्याची काटेकोर अंमलबजावणी मंगळवारी केली जाणार आहे .

कोणीही नियम मोडलेले आढळल्यास त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.त्यामुळे जनतेने देखील आठवडा बाजारासाठी कणकवलीत गर्दी करू नये असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले . तसेच कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे , सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी नियमांचे काटेकोर पालन नागरीकांनी करावे असेही आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे .
 

Web Title: Kankavali Week Market Completely Closed, Information by Sameer Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.