‘गडहिंग्लज’च्या नावलौकिकात कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:53+5:302021-08-02T04:09:53+5:30

गडहिंग्लज : दैनंदिन काम प्रामाणिकपणे करण्याबरोबरच विविध शासकीय योजना आणि उपक्रमात अधिकारी व कर्मचारी मनापासून झटल्यामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला केंद्र ...

Invaluable staff contributions to Gadhinglaj's reputation | ‘गडहिंग्लज’च्या नावलौकिकात कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान

‘गडहिंग्लज’च्या नावलौकिकात कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान

Next

गडहिंग्लज :

दैनंदिन काम प्रामाणिकपणे करण्याबरोबरच विविध शासकीय योजना आणि उपक्रमात अधिकारी व कर्मचारी मनापासून झटल्यामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला केंद्र व राज्याकडून अनेक मान-सन्मान मिळाले. किंबहुना, त्यांच्या योगदानामुळेच गडहिंग्लज नगरीचा नावलौकिक सर्वदूर पोहोचला, असे गौरवोद्गार नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी काढले.

गडहिंग्लज नगरपालिकेच्या १३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कर्मचारी सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

उपनगराध्यक्ष महेश कोरी, विरोधी पक्षनेते हारुण सय्यद यांच्यासह सर्व नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.

सय्यद म्हणाले, गडहिंग्लज पालिकेला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ती प्राणपणाने जपली आहे.

मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर म्हणाले, गडहिंग्लज नगरीला समृद्ध वैचारिक वारसा असून कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यासाठी नगरसेवक वर्गणी काढतात ही दुर्मीळ गोष्ट गडहिंग्लजमध्येच पहायला मिळाली.

यावेळी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, लेखापाल शशीकांत मोहिते, सागर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल राजू भुईंबर यांनी सूत्रसंचलन केले. नगरसेविका वीणा कापसे यांनी आभार मानले.

कर्मचारी भारावले..!

खाते प्रमुखांसह कायम व कंत्राटी मिळून २७५ कर्मचाऱ्यांचा विमा प्रमाणपत्र, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी भारावून गेले.

कृतज्ञतेपोटीच सन्मान..!

सातवा वेतन आयोग, वेतनवाढी, अनुकंपा व वारसा हक्काचा लाभ यासाठी कुणालाही भेटण्याची वेळ येऊ दिली नाही. कर्तव्य आणि कृतज्ञतेच्या भावनेतूनच कर्मचाऱ्यांचा सन्मान केला, असे नगराध्यक्षा कोरींनी आवर्जून सांगितले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्याहस्ते स्वच्छता मुकादम रेखा डावाळे यांचा, नगरसेविका सुनीता पाटील यांच्याहस्ते मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांचा तर नगरसेविका शुभदा पाटील यांच्याहस्ते स्वच्छता कामगारांचा सत्कार झाला. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी व नगरसेवक उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : ०१०८२०२१-गड-०५

Web Title: Invaluable staff contributions to Gadhinglaj's reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.