कळंबा टाकीच्या दुरुस्तीच्या कामामुळे अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:33+5:302021-01-22T04:22:33+5:30

कोल्हापूर : महापालिकेकडून अमृत योजनेअंतर्गत कळंबा जलशुध्दिकरण केंद्र येथील उंच टाकी व संप दुरूस्तीचे काम आज, शुक्रवारपासून हाती घेण्यात ...

Insufficient water supply due to repair work of Kalamba tank | कळंबा टाकीच्या दुरुस्तीच्या कामामुळे अपुरा पाणीपुरवठा

कळंबा टाकीच्या दुरुस्तीच्या कामामुळे अपुरा पाणीपुरवठा

कोल्हापूर : महापालिकेकडून अमृत योजनेअंतर्गत कळंबा जलशुध्दिकरण केंद्र येथील उंच टाकी व संप दुरूस्तीचे काम आज, शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे टाकीवर अवलंबून असणाऱ्या परिसरास काम पूर्ण होईपर्यंत बायपासद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असणाऱ्या परिसरात कमी दाबाने, अपुरा तसेच नियोजित वेळेमध्ये बदल होऊन पाणीपुरवठा होणार आहे. हे काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील हे महापालिकेने स्पष्ट केलेले नाही.

पाणीपुरवठ्यावर परिणाम होणारा परिसर : जरगनगर ले आऊट नं.१ ते ४ संपूर्ण भाग, भूमिनंदन कॉलनी, अक्कलकोट स्वामी समर्थनगर, मंडलिक पार्क, गुरुकृपा शेजारील अपार्टमेंट, विजयनगर, कारंजकर हॉस्पिटल पिछाडीचा परिसर, शहाजी वसाहत, टिंबर मार्केट परिसर, आव्हान स्पोर्ट्स, एल.आय.सी.कॉलनी, वसंत विश्वास पार्क, ज्योतिर्लिंग कॉलनी परिसर, दत्त गल्ली परिसर, निर्माण चौक परिसर, जुनी मोरे कॉलनी, रामानंदनगर खालील भाग, रामानंदनगर वरचा भाग, गुरुकृपा कॉलनी संपूर्ण भाग, संभाजीनगर परिसर, रामानंदनगर परिसर, तपोवन परिसर, खापणे गल्ली, खंडोबा मंदिर परिसर, वाय. पी. पोवारनगर, सुभाषनगर, सरनाईक वसाहत, खण भाग, सुधाकर नगर, भारतनगर, जोतिर्लिंग कॉलनी, शरहद मोहल्ला, वर्षानगर, संत रोहिदास कॉलनी, माळी कॉलनी, विश्वकर्मा भाग, सरनाईक वसाहत, अरिहंत पार्क, वृंदावन पार्क, खण भाग संपूर्ण, सिरत मोहल्ला भाग, वाय. पी. पोवार नगर, वीर ककैय्या हायस्कूल परिसर, सुधाकर नगर, जगदंबा मंदिर परिसर, खणभाग, जमादार कॉलनी, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, साळोखे पार्क, खत्री लॉन परिसर, गजानन महाराजनगर परिसर, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर मेन रोड, गणेश कॉलनी, बाबासोा साळोखे पार्क, मधुबन कॉलनी, जलदर्शन कॉलनी, राधिका कॉलनी, तपोवन म्हाडा, सोमराज कॉम्प्लेक्स, जुईनगर, नाळे कॉलनी बाग परिसर, लिंगम कॉलनी, जुनी मोरे कॉलनी परिसर, म्हसोबा मंदिर परिसर, कोल्हापूर सॉ मिलसमोरील परिसर, टिंबर मार्केट, स्टेट बँक कॉलनी, वृंदावन पार्क, हनुमाननगर परिसर, रायगड कॉलनी.

Web Title: Insufficient water supply due to repair work of Kalamba tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.