स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 02:40 PM2020-09-30T14:40:18+5:302020-09-30T14:43:10+5:30

सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली.

Install automatic fire extinguishing system for hospitals in the district: Rajendra Patil-Yadravkar | स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर

स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर

googlenewsNext
ठळक मुद्दे स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा  : राजेंद्र पाटील-यड्रावकर सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट

कोल्हापूर : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी बैठक घेतली.

ते म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, धोका टळला सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर लवकरात लवकर फायर ऑडीट करुन घ्यावे. आरोग्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा द्यावी.

 जिल्ह्यातील बाधितांची संख्या, मुक्त झालेल्यांची संख्या, मृत्यूदर, उपचार घेत असणारे रुग्ण, रेमडेसिवीरची उपलब्धता, इतर अनुषंगिक औषधांची उपलब्धता, आरोग्य साधनांची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती यड्रावकर यांनी घेतली.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे, डॉ. बी. वाय. माळी उपस्थित होते.

Web Title: Install automatic fire extinguishing system for hospitals in the district: Rajendra Patil-Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.