जिल्ह्यातील १२ अवैध सावकारांवर छापे, एकाच वेळी १६ पथकाकरवी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 03:38 PM2019-12-12T15:38:11+5:302019-12-12T15:44:37+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार आणि पोलिस प्रशासनाने तक्रार असणाऱ्या अवैध सावकारांवर गुरुवारी छापे टाकून झाडाझडती घेतली. यात कोल्हापूर शहर, मुरगुड, राधानगरी, भूदरगडमधील १२ सावकारांचा समावेश आहे. १६ पथकांनी एकाच वेळी केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Impressions on 3 illegal lenders in the district | जिल्ह्यातील १२ अवैध सावकारांवर छापे, एकाच वेळी १६ पथकाकरवी छापे

जिल्ह्यातील १२ अवैध सावकारांवर छापे, एकाच वेळी १६ पथकाकरवी छापे

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील १२ अवैध सावकारांवर छापे, एकाच वेळी १६ पथकाकरवी छापेकोल्हापूर शहर, मुरगुड, राधानगरी, भूदरगडचा समावेश

कोल्हापूर: जिल्ह्यातील सहकार आणि पोलिस प्रशासनाने तक्रार असणाऱ्या अवैध सावकारांवर गुरुवारी छापे टाकून झाडाझडती घेतली. यात कोल्हापूर शहर, मुरगुड, राधानगरी, भूदरगडमधील १२ सावकारांचा समावेश आहे. १६ पथकांनी एकाच वेळी केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खासगी सावकारीला कांही नियम अटी घालून सहकार विभागाने मान्यता दिली आहे. पण परवाना नसताना अवैधरित्या सावकारी होत असल्याच्या आणि जाणिवपुर्वक कर्जदारांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अतिशय गुप्तता पाळून सहकार विभागाने गुरुवारी पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी छापे टाकले.

त्यासाठी १६ पथके तयार करण्यात आली होती.यात ४८ पोलिस, ५ पोलिस अधिकारी आणि सहकारचे १३ अधिकारी व कर्मचारी असे ५0 जणांचा या पथकात समावेश होता, अशी माहिती सहकारचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी सांगितले.
 

 

Web Title: Impressions on 3 illegal lenders in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.