होळी छोटी .. स्मशानभूमीस मदत मोठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 02:13 PM2021-03-29T14:13:07+5:302021-03-29T14:15:15+5:30

Holi kolhapur- पारंपरिक सणाचा उत्साह कायम ठेवीत सार्वजनिक ठिकाणी साजरी होणारी होळी छोटी करुन पंचगंगा स्मशानभूमीस सुमारे पाच लाख शेणी दान करण्याचे औदार्य रविवारी कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्तत्यांनी या कामी पुढाकार घेत महापालिकेच्या आवाहनास साथ दिली. सणातील पारंपारिक गोडवा व आनंद जपतही लोक पर्यावरणरक्षण, समाजहित या गोष्टीकडे वळत असल्याचे चांगले चित्र त्यातून पुढे आले. हे बदलत्या कोल्हापूरची ही मनोभूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.

Holi is small .. help to the cemetery is big | होळी छोटी .. स्मशानभूमीस मदत मोठी

 कोल्हापूर शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी होळी छोटी करुन पंचगंगा स्मशानभूमीस मोठ्या प्रमाणात शेणी दान केल्या. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. (छाया. नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देहोळी छोटी .. स्मशानभूमीस मदत मोठी बदलते कोल्हापूर : पाच लाख शेणी दान स्वरुपात

कोल्हापूर : पारंपरिक सणाचा उत्साह कायम ठेवीत सार्वजनिक ठिकाणी साजरी होणारी होळी छोटी करुन पंचगंगा स्मशानभूमीस सुमारे पाच लाख शेणी दान करण्याचे औदार्य रविवारी कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्तत्यांनी या कामी पुढाकार घेत महापालिकेच्या आवाहनास साथ दिली. सणातील पारंपारिक गोडवा व आनंद जपतही लोक पर्यावरणरक्षण, समाजहित या गोष्टीकडे वळत असल्याचे चांगले चित्र त्यातून पुढे आले. हे बदलत्या कोल्हापूरची ही मनोभूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.

कोल्हापूर शहर परिसरात होळी सण प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गल्ली-गल्लीत, चौका-चौकात उंच होळी करण्यात इर्षा चाललेली पहायला मिळत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने होळी छोटी करुन पंचगंगा स्मशानभूमीला शेणी व लाकडे दान करण्याचे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले होते. त्याला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्या दोन दिवसात स्मशानभूमीकडे सुमारे पाच लाख शेणी दान म्हणून जमा झाल्या आहेत. स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे यांनी शेणी दान स्वीकारल्या.

शेणीदान उपक्रम यांचे योगदान महत्वाचे
१.सानेगुरुजी वसाहत संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शारंगधर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी २ लाख ५० हजार
२. फुलेवाडीतील मानसिंग पाटील प्रेमी ग्रुप तर्फे ५१ हजार,
३.कोल्हापूर जिल्हा कॅटरर्स असोसिएशनतर्फे ५१ हजार,
४.ब्राम्हणसभा करवीर तर्फे १५ हजार,
५.अचानक तरुण मंडळातर्फे २५ हजार,
६.निवृत्ती तरुण मंडळातर्फे ११ हजार,
७.सम्राट फ्रेंडस सर्कलतर्फे ११ हजार,
८.सरोज इंडस्ट्रीजतर्फे अजित जाधव यांनी १० हजार,
९.रोहित घळसाशी मित्रपरिवार यांच्यातर्फे ६ हजार,
१०. शिवाजी पार्क विकास मंच तर्फे पाच हजार, दत्तलक्ष्मी कॉलनी व व्यंकटेश कॉलनीतर्फे ५ हजार,
११. शिवतेज खराडे यांच्यातफॅे ५ हजार,
१२. नवनाथ करके यांच्यातर्फे ५ हजार,
१३. राजलक्ष्मी फौंडेशनतर्फे ५ हजार,
१४. कॅसेट ग्रुपतर्फे ५ हजार,
१५. जयभवानी स्पोर्टतर्फे ५ हजार,
१६. उदय राजाराम माळी यांच्यातर्फे २ हजार

 

Web Title: Holi is small .. help to the cemetery is big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.