कोल्हापूर : जिल्ह्यावर कोणतेही संकट आले तर दातृत्वासाठीही कोल्हापूरकर नेहमीच अग्रस्थानी राहतात. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, अशी भावना मनात ठेवून‘हेल्पिंग हँड कोल्हापूर’ या संस्थेच्या माध्यमातून तरुणांचा मदतीसाठी पुढाकार घेतला. शहरातील विविध रुग्णालयांबाहेर कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांसह निराधारांना रोज किमान ७०० हून अधिक भोजनाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या पोहोच करण्याचा त्यांचा अहोरात्र उपक्रम सुरू आहे.
‘हेल्पिंग हँड’ या संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह किरकोळ नोकरी करणारे तरुण-तरुणी हे आपल्या खिशातून आर्थिक हातभार लावत, एकत्र येऊन हे समाजाभिमुख काम करीत आहेत. सलग दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत हे तरुण मदतीसाठी सरसावले आहेत. शहरातील सरकारी रुग्णालयाबाहेरील रुग्णांचे नातेवाईक, शिवाय ताराराणी चौक ते तावडे हॉटेल रस्त्याकडेचे मूर्तिकार चितोडिया समाज, विविध ठिकाणच्या निराधारांपर्यंत जाऊन त्यांना दोन वेळच्या भोजनाची पाकिटे देत आहेत. याशिवाय शाहूपुरी पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्कचे वाटपही करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून मयूर पाटील, प्रणाम बुधले, अवधूत सोनुले, सुज्वल घोटणे, संकेत पंडत, अभिषेक ढेरे, तानाजी सुतार, प्रथमेश भोई, विनायक भोई, विनायक भोसले, अक्षय जाधव, प्रसाद बुधले, वैभवी भोसले, शिवानी कोरे, श्वेता भोई, स्नेहा बुधले, वैशाली भोई, सुजाता बुधले, आदी उपक्रम राबवत आहेत.
भटक्या कुत्र्यांनाही खाद्य
लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांच्या भुकेचाही विचार करून ‘हेल्पिंग हँड’ च्या वतीने एक टीम तयार करून ती दिवसातून दोन वेळा शहर व परिसरातील भटक्या कुत्र्यांना ब्रेड, बिस्किटे, खाद्य पुरवीत आहे.
फोटो नं. १८०५२०२१-कोल- हेल्प०१,०२
ओळ : ‘हेल्पिंग हँड कोल्हापूर’ या संस्थेच्या वतीने कोल्हापुरात मंगळवारी कोरोना कालावधीत निराधारांना भोजनाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
===Photopath===
180521\18kol_3_18052021_5.jpg~180521\18kol_4_18052021_5.jpg
===Caption===
ओळ : हेल्पींग हॅड कोल्हापूर’ या संस्थेच्यावतीने कोल्हापूरात मंगळवारी कोरोना कालावधीत निराधारांना भोजनाची पाकीटे वाटप करण्यात आले.~ओळ : हेल्पींग हॅड कोल्हापूर’ या संस्थेच्यावतीने कोल्हापूरात मंगळवारी कोरोना कालावधीत निराधारांना भोजनाची पाकीटे वाटप करण्यात आले.