जिल्ह्यात पावसाची भुरभुर, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:23 AM2020-07-04T11:23:49+5:302020-07-04T11:43:10+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. काही तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळिराजाने नि:श्वास सोडला आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे.

Heavy rains in Gaganbawda taluka | जिल्ह्यात पावसाची भुरभुर, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस

जिल्ह्यात पावसाची भुरभुर, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाची भुरभुरगगनबावडा तालुक्यात ५८.५० मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. काही तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळिराजाने नि:श्वास सोडला आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ५८.५०मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली

आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. पावसाला जोर नसला तरी अधूनमधून गगनबावडा, भुदरगड, चंदगड, आजरा, तालुक्यांत मात्र जोरदार पाऊस झाला. 

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ५८.५०मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत ४७.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आज,शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

सकाळपासूनच पावसाची भुरभुर सुरू झाली आहे. पावसाने दुपारी काहीशी विश्रांती घेतली असली तरी त्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने बळिराजाला दिलासा मिळाला असून खरीप पिकांना पोषक ठरत आहे. खरीप पिकांची खुरपणीची कामे संपली आहेत. अजूनही जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात भाताच्या रोपलागण्या प्रलंबित आहेत.

या लागण्यांसह नागलीसाठी पाऊस गरजेचा आहे. त्यामुळे गेले आठ दिवस शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत.

शनिवारी सकाळी आठपर्यंत तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -

हातकणंगले- ०.३८ एकूण १३२ मिमी, शिरोळ- ०.१४ एकूण १२७.२९ मिमी, पन्हाळा- ३.८६ एकूण ३७५.४३ मिमी, शाहूवाडी- १७.८३ मिमी एकूण ५४८, राधानगरी- ११.८३ एकूण ५००.८३ मिमी, गगनबावडा- ५८.५० मिमी एकूण १३२६ मिमी, करवीर- १.५५ एकूण ३२४.६४ मिमी, कागल-१३.२९ एकूण ३७३.४३ मिमी, गडहिंग्लज- ८.७१ एकूण २४९.१४ मिमी, भुदरगड- १८ एकूण ४४२.४०मिमी, आजरा- १८.२५ एकूण ५०१.२५ मिमी, चंदगड- १४.१७ मिमी एकूण ५३६ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.


 

Web Title: Heavy rains in Gaganbawda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.