चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:57+5:302021-07-31T04:25:57+5:30

शित्तूर-वारूण : चांदोली धरणक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर परत वाढल्यामुळे व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे परिसरातील शित्तूर-आरळा, सोंडोली-चरण, ...

Heavy rainfall in Chandoli dam area | चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर

चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर

Next

शित्तूर-वारूण :

चांदोली धरणक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर परत वाढल्यामुळे व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे परिसरातील शित्तूर-आरळा, सोंडोली-चरण, रेठरे-कोकरूड हे पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.

धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून १३८८४ क्युसेक, तर वीजगृहातून ५०५ क्युसेक असे एकूण १४३८९ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढली असून, वारणेस पुन्हा पुराचे स्वरूप आले आहे. नदीचे पाणी पोटमळीत शिरले असून, अवघ्या तीन दिवसांत नदीकाठची पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत.

चांदोली धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसाने २१०० मिलिमीटरचा टप्पा पार केला असून, गेल्या चोवीस तासांत आज सकाळी आठ वाजेपर्यंत ३५ मि.मी., तर आजअखेर २१८३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. धरणात सध्या ८७२.४१० द.ल.घ.मी. म्हणजेच ३०.८१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, धरण सध्या ८९.५५ टक्के भरले आहे.

३० शित्तूर आरळा पूल

फोटो:

चांदोली धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शित्तूर आरळा पूल पाण्याखाली गेला आहे. (छाया : सतीश नांगरे)

Web Title: Heavy rainfall in Chandoli dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.