शिवाजी विद्यापीठात जीव गुंतला, चांगली माणसे भेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:31+5:302021-01-22T04:22:31+5:30
विद्यापीठातील विविध अधिविभागांत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विविध देशांतील विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशित झाले. हे शिक्षण यशस्विरीत्या पूर्ण ...

शिवाजी विद्यापीठात जीव गुंतला, चांगली माणसे भेटली
विद्यापीठातील विविध अधिविभागांत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विविध देशांतील विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशित झाले. हे शिक्षण यशस्विरीत्या पूर्ण केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत, असा संयुक्त कार्यक्रम विद्यापीठ कार्यालयात झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भावी जीवनातील यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रंथभेट व विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. एम.एस. देशमुख, एस.एस. महाजन, के. डी. सोनवणे, जी. एस. राशीनकर, ए. एम. गुरव, ए. डी. जाधव, मेघा पानसरे, के. के. शर्मा, व्ही. वाय. धुपदाळे, आदी उपस्थित होते. ए. व्ही. घुले यांनी प्रास्ताविक केले. जी. एस. राशीनकर यांनी या विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्याबाबतची कार्यवाही केली. जे. बी. यादव यांनी आभार मानले.
चौकट
आपुलकीची भावना
विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमवेत दिवाळीसह विविध सण साजरे केल्याच्या आठवणींसह कोरोनाच्या काळात आपुलकीच्या भावनेतून काळजी वाहिली, त्याबद्दल या विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
फोटो (२१०१२०२१-कोल-विद्यापीठ परदेशी विद्यार्थी) : कोल्हापुरात बुधवारी शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या निरोपाचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विविध अधिविभागप्रमुखांच्या उपस्थितीत झाला.