ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 09:54 PM2020-07-13T21:54:23+5:302020-07-13T22:24:12+5:30

ऐतिहासिक पन्हाळगडावर आज वीर शिवा काशीद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

Greetings to Shiva Kashid and Bajiprabhu Deshpande on the historic Panhalgad | ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

googlenewsNext
ठळक मुद्देपन्हाळगडावर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादनईतिहास प्रेमींकडून पन्हाळ्यावर प्रातिनिधिक पदभ्रमंती

पन्हाळा/कोल्हापूर : ऐतिहासिक पन्हाळगडावर १३ जुलै रोजी प्रतिवर्षी साजरा केला जाणारा स्मृतिदिन वीर शिवा काशीद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यानिमित्ताने दरवर्षी काढण्यात येणारी पदभ्रमंती मोहीम कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती. प्ररातिनिधिक स्वरूपात नेेबापूर येथील शिवा काशीद समाधी येथून बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापर्यंत पदभ्रमंती काढण्यात आली.


आजच्याच दिवशी म्हणजेच १३ जुलै १६६० या दििवशी नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. दरवर्षी आजच्या दिवशी महाराष्ट्रातून हजारो शिवप्रेमी पन्हाळा ते पावनखिंड या वाटेवरून चालत जाऊन नरवीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.


यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेमध्ये दरवर्षी सहभागी होणाऱ्या संस्थांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पन्हाळा पावनखिंड मोहिमेसाठी कुणीही आले नाही,

प्रातिनिधिक स्वरूपात नरवीर शिवा काशीद यांची समाधी ते पन्हाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा या मार्गावर जवळजवळ चाळीस संस्थांचे मुख्य प्रतिनिधी, इतिहास प्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा संपन्न झाली.
या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सवमूर्ती हातात घेत शाहीर आझाद नायंकवडी याानी छत्रपती शिवाजीमहाराजांचे पोवाडे गात स्फूर्ती गीते गाइली.


यावेळी पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रुपाली धडेल,  पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, डॉ.अमर अडके,हेमंत साळोखे, पंडित पवार आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Shiva Kashid and Bajiprabhu Deshpande on the historic Panhalgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.