शिवाजी विद्यापीठात सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:32 PM2019-10-31T18:32:29+5:302019-10-31T18:32:50+5:30

भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांना शिवाजी विद्यापीठात गुरुवारी आदरांजली वाहण्यात आली.

Greetings to Sardar Patel, Indira Gandhi at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात गुरुवारी एकता रॅली काढण्यात आली. त्यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आदींसह शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले.

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

कोल्हापूर : भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांना शिवाजी विद्यापीठात गुरुवारी आदरांजली वाहण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. आर. पी. भणगे, आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रतिमापूजनानंतर विद्यापीठ परिसरात एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के, आदींसह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

 

 

Web Title: Greetings to Sardar Patel, Indira Gandhi at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.