धावत्या दुचाकीवर झाड पडून आजी-नातवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:01+5:302021-06-19T04:18:01+5:30

गडहिंग्लज : मुलीला भेटून नातवासोबत घरी परत येताना दुचाकीवर झाड कोसळून आजीसह नातवाचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेत सोनाबाई ...

Grandmother and granddaughter die after a tree falls on a speeding bike | धावत्या दुचाकीवर झाड पडून आजी-नातवाचा मृत्यू

धावत्या दुचाकीवर झाड पडून आजी-नातवाचा मृत्यू

Next

गडहिंग्लज : मुलीला भेटून नातवासोबत घरी परत येताना दुचाकीवर झाड कोसळून आजीसह नातवाचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेत सोनाबाई जाधव (वय ७५, रा. लिंगनूर कानूल, ता. गडहिंग्लज ) व तिचा नातू सतीश जोतिबा शिंदे (वय ३६, रा. अत्याळ, ता. गडहिंग्लज) अशी मृतांची नावे आहेत. गडहिंग्लज-आजरा रोडवरील हॉटेल सूर्याजवळ सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोनाबाई या गुरुवारी (दि. १७) रोजी अत्याळ येथील आपली मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तिला भेटून पुन्हा शुक्रवारी (दि. १८) सकाळी त्या नातू सतीशच्या दुचाकीवरून लिंगनूरला घरी परत येत होत्या.

दरम्यान, गडहिंग्लज-आजरा रोडवरील हॉटेल सूर्याजवळ दुचाकी आली असता रस्त्याकडेचा मोठा वृक्ष अचानक उन्मळून थेट त्यांच्या दुचाकीवर कोसळला. या घटनेत सतीश व सोनाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे हलविले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार दिनेश पारगे यांनी भेट देऊन पाहणी केली.

सोनाबाई यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सतीशच्या पश्चात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे.

------------------------------------

* सतीशच्या आईला जबर धक्का

सतीश हा गडहिंग्लज येथे एका खासगी शोरूममध्ये कामाला होता. तो अविवाहित होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे आई व बहिणीला सतीशचा मोठा आधार होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. मात्र, पतीच्या निधनानंतर एकुलत्या मुलाचा व आईच्या मृत्यूने सतीशच्या आईला जबर धक्का बसला आहे.

* सतीश शिंदे : १८०६२०२१-गड-०३

* सोनाबाई जाधव : १८०६२०२१-गड-०४

Web Title: Grandmother and granddaughter die after a tree falls on a speeding bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.