ग्रामपंचायतीनं तोडली बंधनं, विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 09:06 PM2022-05-08T21:06:47+5:302022-05-08T21:08:28+5:30

पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसने, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे, हातातील बांगड्या फोडण्याची कुप्रथा आहे.

Gram Panchayat breaks bond, approves resolution to stop widow practice | ग्रामपंचायतीनं तोडली बंधनं, विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर

ग्रामपंचायतीनं तोडली बंधनं, विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर

googlenewsNext

कोल्हापूर - देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, असा ठराव हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केला आहे. त्यामुळे विधवांचा सन्मान करणाऱ्या चळवळीत हेरवाड ग्रामपंचायतीचे पहिले पाऊल पुढे पडले आहे. त्यांच्या या निर्णयाचे महिलांसह सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
   
पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसने, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे, हातातील बांगड्या फोडण्याची कुप्रथा आहे. समाज सुधारला, शिक्षित झाला, वैज्ञानिक प्रगती झाली तरी अशा कुप्रथेतून वैचारीक दारीद्र्य संपलेली नाही हे सिद्ध होते. पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा ठरविले जाते. तिला सामाजिक, धार्मिक, शुभकार्यात  सहभागी होण्यास अलिखित निर्बंध आहेत. वास्तविक पतीच्या आयुष्यासाठी स्वता झिजणार्या या महिलेला पतीच्या निधनानंतर विधवा म्हणून एकप्रकारे बहिष्कृत करुन सामिजिक अप्रत्यक्ष छळच केला जातो. मात्र,या कुप्रथेविरुद्ध आवाज उठविणे, अथवा अशा प्रथा बंद होवून विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी कोणीही पुढे होताना दिसत नाही. 

हेरवाड (ता. शिरंळ) ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सामाजिक सन्मान देण्यासाठी व विधवा प्रथा बंद करण्यासाठी सरपंच सुरगोंडा पाटील यांनी ग्रामसभेत विषय पत्रिकेवर विषय घेवून ठराव केला आहे. यासाठी मुक्ताबाई संजय पुजारी या सूचक असून सुजाता केशव गुरव या दोन्ही सोभाग्यवती  महिलेने अनुमोदन दिले आहे. ग्रामसभेने या ठरावाला एकमताने मंजुरी दिली असून या कुप्रथा विरोधातील चळवळीचे हेरवाड ग्रामपंचायत शिल्पकार ठरणार आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वच थरांतून स्वागत होत असून या चळवळीला बळ आणि मुर्त स्वरुप येण्यासाठी सर्वच ग्रामपंचायत, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

  
विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही ही खंत नेहमी सतावत असते. त्यातच महात्मा फुले सामाजिक संस्था बार्शीचे प्रमोद झिंगार्डे यांनी समाजातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी चळवळ उभारली आहे. त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महिला ग्रामसभेत ठराव केला असून या निर्णयाची गावातूनच अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सुरगौंडा पाटील
सरपंच , हेरवाड ग्रामपंचायत
 

Web Title: Gram Panchayat breaks bond, approves resolution to stop widow practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.